Sairaj Kendre: ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराज केंद्रे चे नगरमध्ये प्रथमच आगमन

 Sairaj Kendre:‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराज केंद्रे चे नगरमध्ये प्रथमच आगमन

Sairaj Kendre:‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराज केंद्रे चे नगरमध्ये प्रथमच आगमन


Sairaj Kendre: रविवारी निखिल वारे यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन


     Sairaj Kendre: अहमदनगर (प्रतिनिधी):  सावेडी उपनगरातील प्रभाग क्र.2चे माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रविवार दि.8 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराज केंद्रे याचे नगरमध्ये प्रथमच आगमन होणार असून, या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तरी सर्व कलाप्रेमींनी या स्पर्धेत भाग घेऊन आपला आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन आयोजक जगदंब युवा प्रतिष्ठान व आंधळे कोचिंग क्लासच्यावतीने करण्यात असे आहे.


     या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे रविवार दिनांक 8रोजी सकाळी10वा. उद्घाटन होणार असून समारंभास पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, सचिन कोतकर आदि मान्यवरांसह प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.


     या स्पर्धेत रंगभरण स्पर्धा, चित्रकला स्पर्धांसाठी बालवाडी, 1ली व 2 री, 3री व 4 थी, 5 वी व 6 वी अशा चार गटात रंग भरण, 9 वी व 10वी विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा सहभागी होता येईल सातवा गट खुला असून, या गटातून चित्रकला स्पर्धा ठेवल्या आहेत, असे जगदंबा युवा प्रतिष्ठानने जाहीर केले.


     या स्पर्धेसाठी स्वच्छ भारत अभियान, चंद्रयान मोहिम, घर घर तिरंगा अशा तीन पैकी एक विषय स्पर्धकांनी निवडायचाआहे. प्रथम चार गटातील रंगभरण स्पर्धेसाठी सकाळी 10 ते 11.30 वेळ आहे तर 5,6 व 7 गटांसाठी दुपारी 12 ते 2 वा. पर्यंत स्पर्धेची वेळ आहे.


     या स्पर्धेचा निकाल लगेच जाहीर करण्यात येईल. दुपारी 3 वा. मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण कार्यक्रम होईल. प्रत्येक गटातील पहिल्या पाच विजेत्यांना ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्वांनाच प्रमाणपत्र, शालेय साहित्य भेट देण्यात येईल. स्पर्धेसाठी आयोजकांतर्फे फक्त कागद पुरविण्यात येईल. इतर साहित्य स्पर्धकांनी स्वत: आणावे, असे आवाहन आंधळे कोचिंग क्लासच्यावतीने करण्यात आले आहे.


     शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रवेश स्विकारले जातील. याबाबत अधिक माहितीसाठी मो.9850000852 या नंबरवर संपर्क साधावा, असे माजी नगरसेवक निखिल वारे यांनी सांगितले.