Sangamner: कुरण मदरसा येथे प्रसिद्ध मोटीवेशनल स्पीकर मूनव्वर जमा यांचे व्यख्यान
Sangamner: अहमदनगर – संगमनेर येथील कुरण स्थित मदरसा एजाजुल उलूम मध्ये सोमवार दि 30 रोजी एक दिवसीय शैक्षणिक सेमिनार आयोजित करण्यात आले आहे.
हैद्राबादचे प्रसिद्ध मोटीवेशनल स्पीकर मूनव्वर जमा व शिक्षण महर्षी तसेच जमिआ इस्लामीया इशत उल उलूम अक्कलकुआ या संस्थेचे सी इ ओ मौलाना हुजैफा वस्तानवी यांची व्यख्याने यावेळी होणार आहेत.
” शिक्षणाची ताकद व राष्ट्रनिर्मितीत युवकांचे योगदान” या विषयावर दोन्ही वक्ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत असे मदरसा इजाजुल उलूम चे अध्यक्ष शेख जमिल अहमद यांनी सांगितले आहे.
कार्यक्रम संस्थेच्या प्रांगणात सायंकाळी 7 वाजता सुरू होईल.विद्यार्थि व नागरिकांनी मोठ्या संख्येने या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आले आहे.