Sant Nirankari: माता सुदीक्षाजी यांच्या उपस्थितीत निरंकारी समागम दि.28 पासून

 Sant Nirankari:  सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या उपस्थितीत वार्षिक निरंकारी संत समागम दि.28 पासून

Sant Nirankari: माता सुदीक्षाजी यांच्या उपस्थितीत निरंकारी समागम दि.28 पासून


    Sant Nirankari: अहमदनगर (प्रतिनिधी):  निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे निरंकारी मिशनचा 76 वा वार्षिक निरंकारी संत समागम 28,29, व 30 ऑक्टोबर 2023 रोजी मिशनच्या विद्यमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन उपस्थितीत भव्य स्वरुपात साजरा होणार आहे. 


या समागमाचा दैवी आनंद देधभरातील लाखो तसेच विदेशातील निरंकारी भक्त आणि श्रद्धाळू घेतील. या समागमास संपूर्ण महाराष्ट्रातून लाखाहून अधिक भाविक सहभागी होतील, अहमदनगर क्षेत्र 36 अ मधील नगरसह सहा जिल्ह्यातील हजारो भाविक या संत समागानात सहभागी होण्यासाठी 24 तारखेपासून रेल्वेने रवाना होत आहेत, अशी माहिती मंडळाचे अहमदनगर क्षेत्रप्रमुख हरिष खुबचंदानी यांनी सांगितले.


     या विषयी अधिक माहिती देतांना हरिष खुबचंदनी म्हणाले,  देशाच्या प्रत्येक राज्यातून भक्तगण ‘वसुधैव कुटूंबकंम’ या सुंदर अनुभूतीसह आपली भाषा, जात, धर्म आणि सर्वस्व विसरुन एकत्वाच्या रुपात सद्गुरुंचे प्रत्यक्ष दर्शन आणि त्यांची दिव्य अमृतवाणी श्रवण करुन तृप्त होतील. 


समागमात सहभागी होण्यासाठी येणार्‍या लाखो श्रद्धाळू, भविक सज्जनांसाठी सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा तसेच त्यांच्या राहण्यासाठी तंबूचे एक विशाल नगर, मुख्य सत्संग पंडाल आदिची तय्यारी निरंकारी सेवा दलाचे देशभरातून आलेले हजारो स्वयंसेवक गेल्या दोन महिन्यांपासून अहोरात्र नि:स्वार्थ सेवा करीत असून, त्याचे फलित म्हणजे भव्य-दिव्य अशा समागमाची तय्यारी पूर्णत्वास येऊन सुंदर दृष्य साकार झाले आहेत.


     समागमाच्या कार्यक्रमाविषयी खुबचंदानी यांनी पुढे सांगितले की, तीन दिवसीय संत समागमाची सुरुवात दि. 28 रोजी भव्य अशा शोभायात्रेने होईल. याप्रसंगी सत्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व राजपिता एका सुशोभित वाहनातून समागम स्थळी येतील. यावेळी त्यांच्या समोर भक्तगण पारंपारिक नृत्य कला सादर करीत अनेकतेतून एकतेचे दृष्य साकार करतील. तद्नंतर दुपारी 2 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत तिन्ही दिवस सत्संग कार्यक्रम होईल व सत्राच्या शेवटी सद्गुरु माताजींचे उपदेशपर आध्यात्मिक प्रवचन होतील. 


दरम्यान समागमाचा दुसर्‍या दिवशी सकाळी निरंकारी सेवादलाची भव्य ‘सेवादल रॅली’ होईल. यात हजारो निरंकारी सेवा दलाचे महिला व पुरुष सदस्य निळी-खाकी वर्दी परिधान करुन कवायती, सेवेविषयी प्रेरणा देणार्‍या नाटिका सादर करुन सद्गुरुंचे आशिर्वाद प्राप्त करतील. तिसर्‍या दिवशी कार्यक्रमात सायंकाळी एक बहुभाषिक कवी संमेलन होईल व शेवटी सद्गुरु माताजींच्या प्रवचनाने समागमाची सांगता होईल.


     सहाजिकच या अलौकिक भव्य दिव्य 76 व्या निरंकारी संत समागमामध्ये प्रेम, एकता आणि शांतीच्या या पवित्र संगमात स्वत:ला सामील करुन परमदैवी आनंद अनुभवू इच्छिणार्‍या प्रत्येक भाविक भक्त गणांना मन:पुर्वक निमंत्रण आहे. आपणही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निरंकारी मंडळाच्या नगर शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.