Sant Sena Maharaj | अहमदनगर शहरात श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा

   Sant Sena Maharaj | अहमदनगर शहरात श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा

Sant Sena Maharaj | अहमदनगर शहरात श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा





  अहमदनगर : दर्शक ।


  सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा नगर शहरात समस्त बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.



     शहरातील पानसरे गल्लीत नगरकर नाभिक पंचाचा वाडा येथे श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीस सकाळी अभिषेक करण्यात आला. महापूजा झाल्यानंतर भव्य-दिव्य रथातून श्री संत सेना महाराजाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.



     या मिरवणूकीत तालयोगी पथकाने ढोल, ताश्याचा निनादाने रंगत आणली. भजनी मंडळाने मिरवणूकीत सहभाग घेतला. पानसरेगल्ली,अर्बन बँक चौक, भिंगारवाला चौक, कापडबाजार, तेलीखुंट, नेतासुभाष चौक, नवीपेठ मार्गेमिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकात श्री संत सेना महाराज यांच्या पालखी, रथाचे पूजन करण्यात आली. दर्शनासाठी गर्दी झाली होती. सुवासिनींनी फुलांची उधवण करुन फुगडी व फेर धरले.



     अहमदनगर शहराचे आ.संग्राम जगताप यांनी कापड बाजार येथे मिरवणुकीत सहभागी होऊन नाभिक बांधवांना शुभेच्छा दिल्या. मिरवणुकीत सहभागी वाद्य पथकाचे कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, अनिल औटी, सुधाकर काशिद, ज्ञानेश्‍वर गायकवाड, प्रभाकर सांळुके, बाबुराव ताकपेरे, श्रीपाद वाघमारे, निलेश पवळे, विशाल सैदाणे, अनिल निकम, 



आरकेश सांळुके,अशिष ताकपेरे, संदिप शिंदे, दिपक काशिद,ललित मदने, जय वाघ, संतोष जाधव, संतोष शिंदे, सुशिल थोरात, संतोष याधव, बबन काशिद, सागर सांळुके, दिपक बिडवे, शुभम राऊत, ओंकार राऊत, अक्षय शिंदे, सौरभ शिंदे, महेश शिंदे, सागर शिंदे, विजय राऊत, जवाहर भुजबळ, ओंकार भुजबळ, रमेश बिडवे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


     दुपारी आरती करण्यात आली. महाप्रसादाने पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली. या सोहळ्यास नगरशहर सावेडी उपनगर परिसरातील समस्त नाभिक समाज, कार्यकर्तेपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.