Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarSatkar | हाजी इब्राहिम स्टेट येथे यशस्वी सीए विद्यार्थ्यांचा सत्कार!

Satkar | हाजी इब्राहिम स्टेट येथे यशस्वी सीए विद्यार्थ्यांचा सत्कार!


 हाजी इब्राहिम स्टेट येथे यशस्वी सीए विद्यार्थ्यांचा सत्कार!

Satkar | हाजी इब्राहिम स्टेट येथे यशस्वी सीए विद्यार्थ्यांचा सत्कार!


नगर शहरातील २०२५ च्या सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हाजी इब्राहिम स्टेट येथे सय्यद आरिफ सय्यद आणि मित्रपरिवार यांच्या वतीने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा —

१) सय्यद मोहम्मद मुहासिब साजिद,

२) मिर्झा फरदीन अल्ताफ बेग,

३) मोहम्मद रजा सलीम शेख — यांचा पुष्पगुच्छ, मानचिन्ह आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक फिरोज शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन सय्यद आरिफ यांनी मान्यवरांचे आभार मानून केले.

या कार्यक्रमाला सय्यद मुश्ताक, हाजी जावेद शेख, जफर सय्यद, मुजहिद सय्यद, मारुफ सय्यद, माज सय्यद, शेख मोइज्, शशांक रंगवार, सकिब बागवान यांसह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सत्कार सोहळ्यामुळे शहरातील तरुणांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.



RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments