Savedi | प्रयास ग्रुप सावेडी शाखेच्या अध्यक्षपदी रजनी भंडारी

 प्रयास ग्रुप सावेडी शाखेच्या अध्यक्षपदी  रजनी भंडारी

प्रयास ग्रुप सावेडी शाखेच्या अध्यक्षपदी  रजनी भंडारी


               
नगर-येथील गेली ३० वर्ष सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला प्रयास ग्रुपच्या सावेडी शाखेच्या  अध्यक्षपदी  रजनी भंडारी यांनी बिनविरोध निवड करण्यात आली,संस्थापिका अलकाताई मुंदडा यांनी त्याचा सत्कार करून शुभेछया दिल्या.तर उपाध्यक्ष-अनिता काळेउषा सोनी,सचिव-हिरा शहापुरे,रेखा फिरोदियायांची निवड करण्यात आलीप्रयास ग्रुप आणि  नम्रता दादी नानी ग्रुप यांचा 31 वा वर्धापन दिन कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला,यावेळी मोठ्या  संख्येने महिला उपस्थित होत्या ,



            वर्धापन दिन कार्यक्रमात विविध गेम,प्रश्नमंजुषा यांनी कार्यक्रम भरपूर रंगला व महिलांनी खूप बक्षीस मिळवली.कार्यक्रमात आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपली योगदान दिले आहे त्यांचे कौतुक व सत्कार करण्यात आले,कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ग्रुपचा वर्धापन दिन असतो. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शिवशक्तीचा व कर्तृत्वाचा जागर आहे,स्त्री ने आपल्या स्वतःच्या क्षमता ओळखाव्यात आणि आणि स्वतःला सिद्ध करावे असे डॉ.  वृषाली कवळे यांनी सांगितले. 



            ३०  वर्षापासून जे की सामाजिक कार्य केले जात आहे याचा आढावा विद्याताई बडवे यांनी घेतला,या वेळेस दादि नानी ग्रुपच्या अध्यक्षा  जयाताई गायकवाड,डॉ वृषाली कवळे,मीनल  खेडकर,सावेडी ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी,अनिता काळे,उषा सोनी,हिरा शहापुरे,रेखा फिरोदिया,जयश्री पुरोहित,



ग्रुपच्या संस्थापिका अलकाताई मुंदडा,सल्लागार विद्या बडवे,सविता गांधी,मेघना मुनोत,वंदना गारुडकर,राखी जाधवनीलिमा पवार,ज्योती गांधी,उषा सोनटक्के,प्रतिभा भिसे,सोहनी पुरनाळे,सुजाता पुजारी,अर्चना बोरुडे,उज्वला धस,आरती थोरात,ज्योत्स्ना कुलकर्णी,शशिकला झरेकर,शकुंतला जाधव,आशा गायकवाड,साधना भळगट ,ममता दाणी आदींसह मोठ्या संख्नेने महिला  उपस्थित होत्या तर बौद्धिक गेम दीपा मालू यांनी घेतले 



         डॉ वृषाली कवळे यांनी महिलांना १० पैठणी बक्षीस दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली दाऊतकर व सारिका कासट यांनी केले.आभार प्रदर्शन विद्या बडवे यांनी मानले