Wednesday, November 19, 2025
HomeAhmednagarSavedi | वाखुरे बंधूंच्या योगदानामुळे उपनगरात अग्रस्थानी-सभापती राम शिंदें

Savedi | वाखुरे बंधूंच्या योगदानामुळे उपनगरात अग्रस्थानी-सभापती राम शिंदें

Savedi | विनायकराजं प्रतिष्ठान वाखुरे बंधूंच्या योगदानामुळे उपनगरात अग्रस्थानी-सभापती राम शिंदें

 

Savedi | नगर : दर्शक । – सावेडीतील गुलमोहर रोडवर मानाचा उपनगरचा पहिला गणपती म्हणून ओळखले जाणारे विनायकराजं प्रतिष्ठान यावर्षी १८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. परिसरातील गणेशभक्तांसाठी ही संस्था एक वेगळीच ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.विनायकराजं प्रतिष्ठान वाखुरे बंधूंच्या योगदानामुळे उपनगरात अग्रस्थानी आहे असे प्रतिपादन विधानसभेचे   सभापती प्रा राम शिंदें यांनी केले

गणरायाच्या आरतीच्या वेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे  सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित राहिले. त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विपुल वाखुरे पाटील आणि उपाध्यक्ष विनय वाखुरे पाटील हे गेली अनेक वर्षे गणेशोत्सवासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही आघाडीवर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठानने केवळ उत्सव साजरा न करता समाजाला दिशा देणारे अनेक कार्यक्रम राबवले आहेत.

ना शिंदे यांच्या उपस्थितीमुळे वाखुरे बंधूंच्या कार्याचा गौरव झाला असून गेल्या १८ वर्षांत विपुल वाखुरे आणि विनय वाखुरे यांच्या पुढाकाराने विनायकराजं प्रतिष्ठान हा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरला आहे. सावेडीतील मानाचा गणपती आज वाखुरे बंधूंच्या नावाने ओळखला जातो, हेच या प्रतिष्ठानचं मोठं यश मानलं जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments