Savedi | आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत-के के शेट्टी

नगर : दर्शक । आपली संस्कृती ला खुप मोठी परंपरा आहे, आपले सण , उत्सव हे पूर्वी पासून मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत परंतु अलीकडच्या काळात नवीन पिढी ते विसरत चालली आहे,काही लोक कला लुप्त होत आहे त्याची आपण सर्वानी मिळून जपवणूक केली पाहिजे असे प्रतिपादन अय्यप्पा मंदिराचे अध्यक्ष व भारत भारतीचे माजी अध्यक्ष के के शेट्टी यांनी केले
भारतीय जनता पार्टी सावेडी मंडलातर्फे घेण्यात आलेल्या मंगळागौर स्पर्धेला स्पर्धेत पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी त्याच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक २१ हजार रोख व सन्मानचिन्ह श्रावणी ग्रुप ला देण्यात आले यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, ॲड. अभय आगरकर,माजी महापौर बाबासाहेब वाकळे,सावेडीचे मंडलाध्यक्ष सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे, वसंत लोढा,प्रियाताई जानवे, मनीषा बारस्कर-काळे, उषाताई नलावडे, संगीता खरमाळे, रेणुका करंदीकर, आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक-२१ हजार श्रावणी ग्रुप, द्वितीय क्रमांक- १५ हजार क्लासिक मंगळागौरी ग्रुप, तृतीय क्रमांक- ११ हजार जिजाऊ ग्रुप. दुर्गा संस्कृती ग्रुप, समर्थ ग्रुप व श्रावणसखी ग्रुप यांना प्रत्येकी तीन हजारांचे उत्तेजणार्थ पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट उखाणे स्पर्धेत श्रिया देशमुख, वंदना साबळे यांना पैठणी व ट्रॉफी, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अश्विनी कांबळे यांना मिळाले. तसेच उत्कृष्ट पारंपारिक वेशभूषेसाठी विद्या बडवे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. मंगळागौर स्पर्धेत २२० महिलांचा सहभाग होता
