Savedi: सिव्हिल हडको मध्ये मोठ्या उत्साहात हनुमान चालीसा संपन्न

 भाविकांना पूर्ण फळ टरबूज म्हणून प्रसाद वाटप 


Savedi: सिव्हिल हडको मध्ये मोठ्या उत्साहात हनुमान चालीसा संपन्न




         अहमदनगर (प्रतिनिधी) -शहरांमध्ये सध्या रोज विविध ठिकाणी हनुमान चालीसा पठण कार्यक्रमांचे होत आहे,  माजी नगरसेविका कलावती शेळके संग्राम शेळके यांच्या वतीने  गणेश चौक सिव्हिल  हडको  मध्ये हनुमान चालीसा संपन्न झाली व भजन संध्याने आज परिसर दुमदुमला


        मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने  आयोजित सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्या चे ३२ वे पुष्प होते ,मंगल भक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी व सर्व सभासद  यांनी  हा कार्यक्रम सादर केला व राजाभाऊ कोठारी यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले . त्यानंतर हनुमान चालीसा गायन व विविध भजने सादर झाली.हनुमानाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.


           या कार्यक्रमात मोठ्या संख्नेने  प्रभागा  मधील सर्व महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी नगरसेविका कलावती शेळके ,संग्राम शेळके,लक्ष्मण शेळके व सूर्या फाउंडेशनचे अध्यक्ष काका शेळके 


त्याचबरोबर गणेश चौक सिव्हिल हडको मधील मंडळाचे सर्वसभासद कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.हनुमान चालीसा कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित सर्व भाविकांना प्रसाद म्हणून पूर्ण फळ टरबूज वाटप करण्यात आले