आठरे स्कूलच्या विद्यार्थ्यानी बनविल्या राख्या
अहमदनगर (प्रतिनिधी) :
स्वतः बनवलेली राखी भावाला बांधणे किंवा आपण बनविलेली राखी बहिणीकडून बांधून घेणे या सारखा दुसरा आनंद नाही. बहीण भावाच्या या प्रेमाला अजून आनंद मिळावा म्हणून हा उपक्रम आयोजित केला त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो असे प्रतिपादन आठरे पाटील पब्लिक स्कूल संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे यांनी केले.
सावेडीतील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेत सर्व विद्यार्थ्यांसाठी राखी बनवणे हा उपक्रम राबविण्यात आला होता त्यास डॉ आठरे यांनी भेट दिली व राख्यांची पाहणी केली त्यावेळेस ते बोलत होते.
राखी बनवा या उपक्रमांतर्गत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनवल्य.आठरे स्कुल हे नित्य नवीन उपक्रमांसाठी ओळखले जाते.या विद्यालयातील इयत्ता १ ते १० वि च्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला,राखी बनवणे या उपक्रमाचा! स्वतः एखादी वस्तू बनवण्याचा आनंद या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने उपभोगला.
उपक्रम यशश्वीतेसाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, समन्वयक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले