आठरे पाटील पब्लिक स्कूल मध्ये शालेय फूटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रदान
अहमदनगर । दर्शक :
शहराच्या सावेडी विभागातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात्मक शाळेचा १४ वर्षांखालील मुलांचा फूटबॉल संघ आणि १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या फूटबॉल संघाने शालेय फूटबॉल स्पर्धेत बाजी मारली.त्याचा आज संस्थेच्या वतीने शाळेत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शहरातील वाडिया पार्कच्या भव्य मैदानावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत घेण्यात आलेल्या शालेय फुटबॉल स्पर्धेत शहरातील एकूण १९ शाळेच्या फूटबॉल संघाने सहभाग घेतला होता.
सकाळी प्रार्थनेच्या वेळी सदर विजयी फूटबॉल संघातील सर्व खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक संदीप दरंदले यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश भाटिया विश्वस्त मानसिंग आठरे पाटील या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पदक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, समन्वयक सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेचे खेळाडू टेमकर कृष्णा,चंद अशोक , चंद भानुदास व सय्यद आफिया , पवार निलम यांनी आपल्या शाळेच्या फूटबॉल संघांना विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावून शालेय फूटबॉल स्पर्धेत मानाचा तुरा रोवला. आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या 17 वर्षाखालील मुलांच्या फूटबॉल संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी करत उपांत्य सामन्यात ओ. ए.एस.आय.एस.इंग्लिश मीडियम शाळेच्या फूटबॉल संघाचा २-१ ने पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश करून अतितटीच्या अंतिम सामन्यात श्री. साई इंग्लिश मीडियम शाळेच्या फूटबॉल संघाचा २-० ने पराभव करून विजेता संघ ठरला. तसेच 17 वर्षांखालील मुलींच्या फूटबॉल संघाने सुद्धा उत्कृष्ट अशी कामगिरी करत उपांत्य सामन्यात रेसिडेन्सील हायस्कूलच्या फूटबॉल संघाचा १-० ने पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला .
आणि आयकॉन पब्लिक स्कूलच्या बलाढ्य फूटबॉल संघाचा ३-० ने पराभव करत मुलींच्या फूटबॉल संघाने शालेय फूटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.तसेच १४ वर्षांखालील मुलांच्या फूटबॉल संघानेही आपल्या कौशल्याने स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली . उपांत्य सामन्यात श्री.साई इंग्लिश मिडीयम स्कूल फूटबॉल संघाचा ४-० ने पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.आणि अंतिम सामन्यात आयकॉन पब्लिक स्कूलच्या फूटबॉल संघाशी चुरशीची लढत देऊन ३-० ने सामना जिंकला.तिन्हीही विजयी फूटबॉल संघांची विभागीय पातळीवर निवड झाली.
शाळेच्या विजयी फूटबॉल संघाच्या खेळाडूंना शाळेचे क्रीडा प्रशिक्षकसंदीप दरंदले,सोनवणे शीतल यांचे मार्गदर्शन लाभले.