विजयी मल्लांचा भाग्योदय विद्यालयाच्या वतीने सत्कार

school kusti | नगर : दर्शक ।
अहमदनगर शहर जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कुस्तीपटूंनी नेत्रदीपक कामगिरी करून संपूर्ण विद्यालयाचा अभिमान वाढवला. या स्पर्धेत ओम हिरामण कोतकर (१२५ केजी) याने सुवर्णपदक पटकावले,
तर कांडेकर साई भरत (९७ केजी), कांबळे श्रीनाथ शशिकांत (५० केजी) आणि घाट विसावे दीपक आशिष यांनी रौप्यपदके जिंकली. या उल्लेखनीय यशामुळे भाग्योदय विद्यालयाच्या चारही मल्लांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांच्या पुढील वाटचालीबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विजयी मल्लांचा विद्यालयाच्या वतीने श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भाग्योदय विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री ज्ञानदेवजी बेरड यांनी मार्गदर्शनपर भाषण करताना सांगितले की,
“आमच्या विद्यार्थ्यांनी केलेली ही कुस्तीतील कामगिरी ही केवळ विद्यालयाची नव्हे तर संपूर्ण अहमदनगर शहराची शान आहे. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि चिकाटी यांच्या जोरावर आमचे विद्यार्थी अधिक उंची गाठतील, असा मला दृढ विश्वास आहे. आगामी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही आमचे मल्ल नक्कीच पदके जिंकतील.”
याप्रसंगी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सोपान तोडमल, एकनाथ होले, दत्तात्रय पांडुळे, कांडेकर गोरक्ष, गणेश गायकवाड, बाळासाहेब कावरे, संजय शिंदे यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
