Shikshak : शिक्षक महासंघांच्या सहसचिवपदी सारडाच्या डॉ.स्मिता भुसे यांची निवड

 महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघांच्या सहसचिवपदी  सारडा च्या डॉ.स्मिता भुसे यांची निवड

Shikshak : शिक्षक महासंघांच्या सहसचिवपदी  सारडाच्या डॉ.स्मिता भुसे यांची निवड





अहमदनगर । दर्शक :-



     कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ या शासनमान्य नोंदणीकृत संघटनेची नवीन कार्यकारी ची निवड नुकतीच महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांच्या उपस्थितीत ऑनलाईन सभा घेऊन जाहीर करण्यात आली. 



सन 2010 पासून ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहे.2019 ला कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ या नावाने संघटनेची अधिकृत नोंदणी करण्यात आली.महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालय विषय स्तरावर मराठी विषय शिक्षकांची ही सर्वात मोठी व्यापक एकमेव संघटना आहे.



मराठी भाषेचे संवर्धन करणे,मराठी भाषा विषय शिक्षकांच्या समस्या सोडविणे, मराठी विषय अध्ययन अध्यापनातील येणार्‍या अडचणीचे शंकानिरसन करणे आणि महाराष्ट्रात मराठी भाषा विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचा होण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणे ही महासंघाची भूमिका आहे.



     महासंघाच्या घटनेप्रमाणे दर तीन वर्षांनी राज्य कार्यकारणीची निवड करून कार्यकारिणी घोषित करण्यात येते. प्रत्येकवेळी नवीन इच्छुक व अभ्यासू शिक्षकांना सहभागी करून प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली जाते. सन 2024 ते 2027 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची नवीन राज्य कार्यकारणी घोषित करण्यात आली.यामध्ये पेमराज सारडा महाविद्यालयाच्या डॉ स्मिता भुसे यांची राज्य सहसचिवपदी  फेरनिवड झाली तर कार्याध्यक्ष म्हणून डॉ. मनीषा रिठे वर्धा यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली.




या निवड संदर्भात बोलताना डॉ स्मिता भुसे म्हणाल्या की प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याची भाषा अनिवार्य आहे तसे महाराष्ट्र राज्यात माय मराठी विषय बारावी पर्यंत सक्तीचा व्हावा यासाठी ही लढाई आहे. मराठी विषयाची ही राज्यकार्यकारिणी सर्व समावेशक असून महाराष्ट्रात इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मराठी विषय हा सक्तीचा व्हावा,मराठी विषय शिक्षकांचा कार्यभार कायम रहावा याबरोबरच मराठी विषय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जाव्यात यासाठी ही राज्यकार्यकारिणी कटिबद्ध आहे असे उद्गार महासंघाचे अध्यक्ष सुनील डिसले यांनी काढले.




     डॉ.स्मिता भुसे यांनी याआधी अभ्यास मंडळावर मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मध्ये काम केले आहे.तसेच नूतन मराठी पाठ्यपुस्तकातील त्रृटी,लेखी पर्यावरण प्रकल्प फोल प्रकल्प यावर अभ्यास मंडळाकडे संशोधन लेख सादर केले आहेत.भाषा तज्ञ प्रशिक्षक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.



डॉ.स्मिता भुसे या प्रथितयश लेखिका असून त्यांची सात पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.डिप्रेशन, एंजायटी यामधून होणारी आत्महत्या यामागील कारणांचा शोध घेणारी अंकुरलेल्या बीजासाठी हा त्यांचा दीर्घ काव्यसंग्रह लोक प्रचलित आहे.अशा बहुचर्चित डॉ स्मिता भुसे यांची महाराष्ट्र राज्य मराठी विषय महासंघाच्या सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल हिंद सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी, प्राचार्यांनी अभिनंदन केले आहे.