Sindhi Samaj: सिंधी जनरल पंचायत आयोजित ‘चालिहो उत्सव मेला’ उत्साहात साजरा

Sindhi Samaj: सिंधी जनरल पंचायत आयोजित ‘चालिहो उत्सव मेला’ उत्साहात साजरा

Sindhi Samaj: कोटा (राजस्थान) येथील लखमीचंद अ‍ॅण्ड ग्रुपचा भक्ती संगीताचा कार्यक्रम पार पाडला

Sindhi Samaj: अहमदनगर (प्रतिनिधी): सिंधी बांधवांचे इष्टदेव भगवान झुलेलाल यांच्या चाळीस दिवसांच्या उपवासाची सांगता निमित्त ‘चालिहो उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नगरमधील सिंधी जनरल पंचायतच्या वतीने समाज बांधवांसाठी चालिहो उत्सवाच्या पुर्व संध्येला येथील संजोग लॉन्स येथे ‘पू.चालिहो साहिब जो मेलो’ हा सिंधी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी कोटा (राजस्थान) येथील लखमीचंद अ‍ॅण्ड ग्रुपचा भक्ती संगीताचा कार्यक्रम पार पाडला.

‘चालिहो उत्सव’ मेळाव्यास अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सिंधी बांधवांना शुभेच्छा दिल्या

सदर उत्सवासाठी मोठ्या संख्येने स्थानिक तसेच जिल्ह्यातील सिंधी समाज बांधव सहकुटूंब सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी शाही भोज व अनेक खाद्यपेयांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. त्याचा आस्वाद घेत व सांस्कृतिक संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घेत ऐकमेकांच्या गाठी-भेठी व गप्पात सर्वजण मग्न झाले होते. या प्रकारे एक दिमाखदार स्नेह मेळाव्याची अनुभूती उपस्थितांनी घेतली. ‘चालिहो उत्सव’ मेळाव्यास अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सिंधी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

Sindhi Samaj: पूजा सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष महेश मध्यान यांच्या हस्ते करण्यात आली

चालिहो उत्सव समाप्तीनिमित्त सिंधी कॉलनी येथील श्री झुलेलाल मंदिरात ‘पुज्य बहराणो साहिब’ ची पूजा सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष महेश मध्यान यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी अनेक संस्थांचे पदाधिकारी व समाज बांधव, भाविक उपस्थित होते. यावेळी आरती, पल्लवद्वारे संपूर्ण समाज व देशबांधवांसाठी मंगल कामना करण्यात आली. भगवान झुलेलाल अर्थात जलदेवतेच्या चरणी सर्वत्र चांगला पाऊस पडू दे व सगळीकडे सुजलाम: सुफलाम होवो, सर्वजण आनंदाने, निरोगी व प्रेमाने राहो, अशी सामुहिक प्रार्थना करण्यात आली.

मिरवणुकीचा समारोप सायंकाळी झुलेलाल चौक येथे करण्यात आला

त्यानंतर पुज्य ‘बहराणो साहिबची’ सवाद्य मिरवणूक सिंधी कॉलनी, तारकपुर परिसरातून काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने भाविक, महिला व तरुण मंडळी सहभागी झाले होते. मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. मिरवणुकीचा समारोप सायंकाळी झुलेलाल चौक येथे करण्यात आला.

सिंधी व्यापार्‍यांनी एकत्रित येत चालिहो उत्सव उत्साहात साजरा केला

सायंकाळी बाजारपेठ येथेही ‘चालिहो उत्सव’ निमित्त ठिकठिकाणी बहराणो साहिबची पूजा व आरती करत प्रसाद वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने दाळ मंडईत सिंधू नागरी पतसंस्थेच्यावतीने, गंजबाजार भाजी मंडईत बजाज परिवारातर्फे एम.जी.रोड येथील सिंधी व्यापारी संघच्यावतीने कोहिनूर जवळ व चितळे रोडवरील गुरुनानक मार्केट व लोढा हाईटस् या व्यापारी संकुलातील सर्व सिंधी व्यापार्‍यांनी एकत्रित येत चालिहो उत्सव उत्साहात साजरा केला. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंधी जनरल पंचायतचे सर्व पदाधिकारी, अनेक सिंधी संस्थांचे सदस्य व सेवादारांनी विशेष परिश्रम घेतले.