जेके अकॅडमीची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
अहमदनगर (प्रतिनिधी) -अनेक वर्षांपासून परीक्षेत सर्वोत्कृष्ट निकाल देणाऱ्या नगर मधील जामखेड रोड येथील आर्मी पब्लिक स्कूलच्या शेजारी असणाऱ्या जे के अकॅडमी च्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यंदाही पुणे विभागीय शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी परीक्षेत,एसएससी मार्च 2024 या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी याही वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे,
यामध्ये १० विद्यार्थी विशेष श्रेणी तर ४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती अकॅडमीच्या संचालिका प्रा जया क्षिरसागर यांनी दिली.
जेके अकॅडमीच्या विद्यार्थी वेदांत बेरड यांनी 94 गुण मिळवून समाज अभ्यास व 90 गुण मिळवून हिंदी विषयात घेतले, वैभवी करांडे हिने मराठी व गणितात 90 गुण प्राप्त केले,वेदांत बेरड 80% ,प्रियांश कुमार 78% ,विक्रांत भाले 75 टक्के, सिद्धेश शिंदे 75 टक्के,शिवम बोठे 67% ,शुभम बोरुडे ६६%,साहिल बोरुडे ६६%,मोहीता डाके 62%,आदित्य डाके,कृष्णा बेरड द्वितीय श्रेणी मार्क प्राप्त केले आहेत.
या सर्वांना जे के अकॅडमीच्या संचालिका प्रा जया क्षीरसागर ,प्रा नदीम शेख, प्रा प्रवीण सर यांनी मार्गदर्शन केले सीबीएसई बोर्डाच्या निकालामध्येही जे के अकॅडमी चे विद्यार्थी चमकले होते