Stree2 | राजकुमार आणि श्रद्धा यांचा ‘स्त्री २’ ६०० कोटी क्लबमध्ये सामील होणार

 Stree2 | राजकुमार आणि श्रद्धा यांचा ‘स्त्री २’ ६०० कोटी क्लबमध्ये सामील होणार 

Stree2 | राजकुमार आणि श्रद्धा यांचा 'स्त्री २' ६०० कोटी क्लबमध्ये सामील होणार



मुंबई । श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘स्त्री २’ जगभरात गाजत आहे. देशभरात हा चित्रपट दररोज भरपूर कमाई करत आहे. त्याचबरोबर परदेशातही बंपर नोटा छापल्या जात आहेत. ज्या वेगाने कमाई करत आहे, लवकरच हा चित्रपट ६०० कोटी  क्लबमध्ये सामील होणार आहे. 


जाणून घ्या चित्रपटाने 12 व्या दिवशी किती बिझनेस केला आहे.


राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा ‘स्त्री २’ जगभरातील प्रेक्षकांना आवडत आहे. बॉक्स ऑफिसवर निर्मात्यांना याचा जबरदस्त फायदा होत आहे. अवघ्या १० दिवसांत या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. आता ‘स्त्री २’च्या ताज्या वर्ल्डवाइड कलेक्शनची माहिती समोर आली आहे.


मॅडॉक फिल्म्सने अधिकृत इन्स्टा हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यानुसार ‘स्त्री 2’ने आतापर्यंत जगभरात 589 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आज म्हणजेच मंगळवारी श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा ‘स्त्री २’ ६०० कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे.

पहा ट्रेलर

पहा सॉंग