Sujay Vikhe Patil: सुजय विखे विधानसभा लढणार राहुरी, संगमनेर कि अहमदनगर ?

 Sujay Vikhe Patil: सुजय विखे विधानसभा लढणार राहुरी, संगमनेर कि अहमदनगर ?

Sujay Vikhe Patil: सुजय विखे विधानसभा लढणार राहुरी, संगमनेर कि अहमदनगर ?


अहमदनगर शहर विधानसभा जागा महायुतीकडून भाजपला मिळाली तर शहरात डॉ सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप अशी लढत पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र महायुतीकडून शहरात अजित पवार राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असताना हि जागा भाजपला मिळण्याची शक्यता कमी आहे परंतु शहर भाजप नेते मंडळी यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


भाजपला शहराची जागा मिळाल्यास आमदार जगताप हातातील घड्याळ काढून तुतारी उचलतील जस याठिकाणी खासदारकी लढण्यासाठी निलेश लंके यांनी घड्याळ काढून तुतारी उचलली आणि निवडूनही आले तसा प्रयोग विधानसभेसाठी जर महायुतीने हि जागा अजित पवार गटाला दिली नाही तर  आमदार जगताप करतील कि काय अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. 


जर सुजय विखे याना राहुरी मधून उमेदवारी देण्यात आली तर येथे आमदार प्राजक्त तनपुरे विरुद्ध सुजय विखे अशी लढत होईल आणि जर संगमनेरला सुजय विखेंना भाजपने तिकीट दिल्यास माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे  अशी लढत रंगणार 


  आजूबाजूंच्या मतदार संघाचा आढावा घेऊ : सुजय विखे पाटील 


शिर्डी विधानसभा ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल, अशी माझी अपेक्षा आहे. कारण पक्षाचा निर्णय होणे अद्याप बाकी आहे. तिकीट कोणाला मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे. पक्ष निर्णय घेईल, पक्ष त्यांना संधी देईल. आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारात साहेबच सर्वप्रथम असणार आहेत. राहिला मुद्दा माझा, आता मला बऱ्यापैकी वेळ आहे, त्यामुळे आजूबाजूंच्या मतदार संघाचा आढावा घेऊ, असे सुतोवाच त्यांनी केले आहे.