Nivedan | महाराज संग्राम भंडारे यांच्यावर कारवाई करावी काँग्रेसच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

Nivedan | नगर : दर्शक ।
तथाकथीत महाराज संग्राम भंडारे यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या जाहिर धमक्या व द्रेषपूर्ण वक्तव्यांबावत तातडीने कारवाई करणे बाबत आज अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगर जिल्हा काग्रेस कमिटी व सर्व तालुका कांग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये सौ.प्रभावती घोगरे सरचिटणीस प्रदेश कॉग्रेस ,राहुल उगले,प्रदेश सचिव युवक काँग्रेस,शाहजी राजेभोसले,दिप चव्हाण अध्यक्ष नगरशहर,श्यामराव वाघस्कर सरचिटणीस जिल्हा काँग्रेस ,रिजवान शेख अध्यक्ष भिंगार,अरुण म्हस्के नगर तालुका,मनोज गुंदेचा,बाळासाहेब भडारी ,अनिस चुडीवाला,नासीरभाई शेख,पाथर्डीअध्यक्ष,बाळासाहेब आढाव राहुरी अध्यक्ष,दादा पाटील राहुरी,सुनील क्षेत्रे,आदींसह मोठ्या संख्नेने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
निवेदनात म्हटले आहे कि तथाकथीत महाराज संग्राम भंडारे हे सातत्याने समाजात द्वेष पसरविणारे भडकविणारे आणि राजकीय हेतूने लोकांच्या भावनांशी खेळ करणारे विधाने करत आहेत.अलिकडेच त्यांनी भारतीय राष्टीय काग्रेस पक्षाचे वर्किंग कमिटी सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे विरोधात आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असे धक्कादायक विधान केले असून त्यातुन त्यांनी थोरात साहेबांना जिवे मारण्याची उघड धमकी दिली आहे.
याशिवाय भंडारे हे वारंवार थोरात कुटुंब व त्यांच्या समर्थकां विरुध्द चिथावणीखोर विधानं करत असून,सार्वजनिक जीवनात दहशत आणि वैमनस्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यासाठी आमची मागणी आहे कि संग्राम भंडारे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करन कठोर कारवाई करावी, त्यांच्या सर्वं भडकाऊ आणि द्वेषपूर्ण भाषांणाची चौकशी करावी व अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण कृत्यांना समर्थन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी,
जिल्हातील जनता सजग आहे आणि कुणीही यापुढे धार्मिंक किंवा राजकीय कारणाने गोंधळ निर्माण करण्याचा पयत्न केला तर त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी.आम्ही या विषारी वक्तव्यांचा जाहिर निषेध नोंदवत आहोत आणि प्रशासनाकडुन तात्काळ कारवाईची अपेक्षा करत आहोत.
