Urdu School : मासूमिया शिक्षणशास्त्राच्या छात्रशिक्षकांची सेवापूर्ती

 Urdu School : मासूमिया शिक्षणशास्त्राच्या छात्रशिक्षकांची सेवापूर्ती

Urdu School : मासूमिया शिक्षणशास्त्राच्या छात्रशिक्षकांची सेवापूर्ती




अहमदनगर (प्रतिनिधी) – मुकुंदनगर येथील मोहमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत मासूमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील छात्रशिक्षकांचा छात्रसेवाकाल मौलाना आजाद उर्दू हायस्कलमध्ये नुकताच साजरा झाला.

छात्र शिक्षकांनी दैनंदिन तासिका प्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण करून विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा हस्ताक्षर, निबंध, लेखन, चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ वृक्षारोपन खेळ इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व कार्यवाहक प्रा.डॉ अब्दुस सलाम सर होते. 

Urdu School : मासूमिया शिक्षणशास्त्राच्या छात्रशिक्षकांची सेवापूर्ती



प्रमुख पाहुणे म्हणून फरिदा भाभी उपस्थित होत्या. मुख्यध्यापिका फरहाना सय्यद यांनी छात्रशिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. डॉ.एजाज सर व गटप्रमुख शेख आफरीन, सैय्यद शबाना, शेख शबाना, सय्यद सबा, शेख अनिसा मौलाना आझाद हायस्कूलचे शिक्षक वर्ग व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

सर्व स्पर्धेतील यशस्वी विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व धात्र शिक्षकांनी परिश्रम घेतले.