Urdu School: मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीच्या शाळा विद्यालयात सरदार वल्लभ भाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन
Urdu School: अहमदनगर – मोहमदिया एज्युकेशन सोसायटी संचालित सावित्रीबाई फुले प्राथमिक कन्या शाळा , मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल,मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज, मासुमिया डि.एल.एड. कॉलेज व मासुमिया बि.एड. कॉलेज मुकुंदनगर अहमदनगर येथे भारताचे पहिले ग्रहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती व भारताची तीसरी पंतप्रधान श्रीम. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
दोघांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. अब्दुस सलाम सर यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पन करुन अभिवादन करण्यात आले.
प्रा.डॉ.सलाम सर यांनी वल्लभ भाई पटेल व श्रीम. इंदिरा गांधी यांच्या प्रती आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलताना यांनी केले.व शेवटी हसिब सर यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमा मुख्याध्यापक नौशाद सैय्यद, अस्लम पटेल, मुख्याध्यापिका फरहानाबाजी, फरजाना, मुमताज, हिना व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी सावित्रीबाई फुले शाळेच्या मुलींनी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या जीवनातल्या विविध पैलूवर विचार व्यक्त केले.