Vinesh Phogat: 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त विनेश फोगाट अपात्र

 Vinesh Phogat: 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त विनेश फोगाट अपात्र 

Vinesh Phogat: 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त विनेश फोगाट अपात्र



भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. 

विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली. मात्र अंतिम सामन्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, 

स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.

नेमकं काय घडलं?

विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले.

Indian Wrestler Vinesh Phogat disqualified from the Women’s Wrestling 50kg for being overweight.

It is with regret that the Indian contingent shares news of the disqualification of Vinesh Phogat from the Women’s Wrestling 50kg class. Despite the best efforts by the team through… pic.twitter.com/xYrhzA1A2U

— ANI (@ANI) August 7, 2024

विनेश फोगाट के अयोग्य होने से ठीक पहले बजरंग पुनिया ने बीबीसी को दिए इंटरव्यू में विनेश के वज़न पर क्या कहा था? pic.twitter.com/Er3TVresBx

— BBC News Hindi (@BBCHindi) August 7, 2024

व्हिडीओ सौजन्य आभार bbc

VIDEO | “There is nothing left to say. The whole country had the hope of gold medal. She got disqualified. The whole country is sad. It has happened according to the rule, I don’t know whether there is a chance. She will work even harder,” says teary-eyed Mahavir Phogat, uncle of… pic.twitter.com/lTAUe7RkIi

— Press Trust of India (@PTI_News) August 7, 2024

व्हिडीओ सौजन्य साभार PTI