Ward No 1 : कजबे वस्ती परिसरातील प्रश्नांसाठी कायम पाठपुरावा राहील – शारदा ढवण

 पुण्यश्लोकनगर येथील ओपन स्पेसच्या संरक्षक भिंत व सुशोभिकरण कामांचा शुभारंभ

Ward No 1 : कजबे वस्ती परिसरातील प्रश्नांसाठी कायम पाठपुरावा राहील  - शारदा ढवण




     अहमदनगर (प्रतिनिधी)  – गेल्या काही वर्षांपासून कजबे वस्ती परिसरात लोकवस्ती वाढत आहे, तेथील रहिवाशांसाठी लाईट, पाणी, ड्रेनेज, रस्ते आदि मुलभुत सुविधा देण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरवा करुन कामे करण्यात आली आहेत. हा भाग मनपा हद्दीत येत नसल्याने अनेक अडचणींचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत आहे. तरीही आमदार, खासदार, जिल्हा नियोजन अशा विविध निधीच्या माध्यमातून विकास कामे केली जात आहे. या भागातील कामांसाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्याने अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. 


आज शुभारंभ होत असलेल्या ओपन स्पेसच्या संरक्षण भिंत व सुशोभिकरणासाठी सुमारे 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने हा ओपन स्पेस चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल. त्यामुळे मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची मोठी सोय होणार आहे. या भागातील प्रश्नांसाठी आपला कायम पाठपुरावा राहील, असे प्रतिपादन माजी नगरसेविका शारदा ढवण यांनी केले.


     प्रभाग क्र.1 मधील कजबे वस्ती येथील पुण्यश्लोकनगर येथील ओपन स्पेसच्या संरक्षक भिंत व सुशोभिकरण कामांचा शुभारंभ माजी नगरसेविका शारदा ढवण यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी माजी नगरसेवक दिपाली बारस्कर, नितीन शेलार, उदय अनभुले, निशांत दातीर, अनिल ढवण, प्रा.बाळासाहेब शेंडगे, दिपक गायकवाड, सुभाष अबक, विष्णू बारगळ, शरद धलपे, रोहण ढवण, हेमंत कुटे, अंकुश गावडे, आजिनाथ बर्डे, गणेश भोर, संदिप क्षीरसागर, अमर बामदळे आदि उपस्थित होते.


     यावेळी दिपाली बारस्कर म्हणाले, कजबे वस्ती हा भाग मनपाच्या लगत असल्याने नगरसेवक निधीच्या माध्यमातून नागरिकांना मुलभुत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातूनही या भागातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याने कामे मार्गी लागल्याचे समाधान आहे. या भागाचा सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.


     कार्यक्रमास शोभा कजबे, उज्वला थोरात, मेघा काळे, मनिषा उल्हारे, अर्चना दांगट, उषा शेंडगे, सविता धिंदाळे, शितल शिंदे, प्रणाली कुलकर्णी, शैला बारगळ, पुनम भोर, आश्विनी शेंडगे, सुनिल धिंदाळे, दत्तात्रय काळे, सुभाष गुज्जर, संकेत शेंडगे, पाराजी आवारे, रामदास दरंदले, अदित्य कजबे, तुषार माने, योगेश गुंजाळ आदिंसह परिसरातील नागरिक, महिला उपस्थित होते.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बाळासाहेब शेंडगे यांनी केले तर आभार विष्णू बारगळ यांनी मानले.