स्नेह 75 व सायंतारा ग्रुपने महिला दिनाला केला महिला राईडिंग ग्रुपचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी) – बाईक रायडिंग ही एक फॅशन असते. पुरुष नेहमीच ग्रुपने रायडिंगला जाताना दिसतात. महिला फक्त कुठं बाईक रॅली असली कि सहभागी होत असतात. महिलांचा ग्रुप असावा या उद्देशाने महिला बाईक रायडर तयार करण्यासाठी एम्प्रेस बाईकर्स ग्रुपची स्थापना झाल्याने छोट-छोट्या रायईडस आयोजन झाल्यामुळे महिलांनी बाईक राईडबद्दल आत्मविश्वास वाढवावा, असे प्रतिपादन आरती खाडिलकर यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त ट्रेकॅम्प एम्प्रेस बाईकर्स मधील महिलांचा स्नेह 75 व सायंतारा ग्रुपच्या वतीने रायडिंग ग्रुपचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सायंतारा ग्रुपच्या डॉ.अस्मिता अष्टेकर, आरती खाडिलकर, झेबा खान, पूजा पवार यांचे हस्ते राईडिंग ग्रुप मधील महिला नेहा जग्गी, सुजाता पायमोडे, मनिषा कुलकर्णी, अनुराधा जाधव, आशा भालेराव, मिरा होले, रचना काकडे, वर्षा जोशी, श्वेता जोशी आदिंचा सन्मान करण्यात आला.
प्रास्तविकात ट्रेकॅम्प एम्प्रेस बाईकर्स चे संस्थापक विशाल लाहोटी म्हणाले, हा ग्रुप महिलांसाठी बाईकर्सचा समुह आहे. बाईक राईड हा स्वच्छंदी व जबाबदारीने अनुभवण्याचा खेळ आहे. स्त्रीया जबाबदारीने कोणतेही काम पार पाडतात. त्यामुळेच केवळ महिलांसाठी बाईक रायडिंगचा ग्रुप त्यांच्या स्वच्छंदी जीवनाला समर्पित केला, असे सांगितले.
स्नेह 75 चे ईश्वर सुराणा म्हणाले, यशस्वी पुरुषांच्या मागे स्त्री ही कायम उभी असते. आपण देखील त्यांच्या यशात सहभागी होऊन त्यांना पाठबळ देऊन त्यांच्यामागे उभे राहिले पाहिजे. या उद्देशाने महिलांचा खास सन्मान आजच्या जागतिक दिनानिमित्त करणे आमचे कर्तव्य आहे.
सायंतारा ग्रुपच्या डॉ.अस्मिता अष्टेकर यांनी सर्व महिलांनी बाळनाथ गडावर केलेले बाईक रायडिंग प्रशांसा करण्यासारखे आहे. महिलांनी महिलांचा गौरव, सन्मान करणे, आजच्या दिवशी उचित ठरते. कार्यक्रमास ईश्वर सुराणा, किशोर रेणाविकर, अभय गांधी, शशिकांत उदास, अजित चाबुकस्वार आदि उपस्थित होते. प्रमोदकुमार छाजेड यांनी आभार मानले.