World News: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशिया अध्यक्ष पुतिन यांची दूरध्वनीवरून चर्चा

World News: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशिया अध्यक्ष पुतिन यांची दूरध्वनीवरून चर्चा

World News: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशिया अध्यक्ष पुतिन यांची दूरध्वनीवरून चर्चा


 नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पंतप्रधान मोदींचा हा संवाद महत्त्वाचा आहे कारण त्यांनी नुकतीच झेलेन्स्की यांची भेट घेतली आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून नुकत्याच झालेल्या युक्रेन दौऱ्याची माहिती घेतली होती.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आज राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा झाली. विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. रशिया-युक्रेन संघर्ष आणि माझ्या नुकत्याच झालेल्या युक्रेन भेटीवर विचारांची देवाणघेवाण झाली. संघर्षाच्या लवकर, टिकाऊ आणि शांततापूर्ण तोडग्याला पाठिंबा देण्याच्या भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

युक्रेन युद्ध रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींची मदत घेतली जाऊ शकते, असे अमेरिकेला वाटते. दोघांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक संवाद हाच एकमेव मार्ग आहे, असेही पंतप्रधान मोदी वारंवार सांगत आहेत. या दोन्ही देशांमध्ये सेतू बांधण्याचे काम भारत करू शकत असेल तर त्यासाठी आम्ही तयार आहोत, असे पंतप्रधान वारंवार सांगत आहेत. त्यामुळे मोदी-बायडन यांच्यानंतर मोदी आणि पुतिन यांच्यातील संभाषणाचा अर्थ विशेष आहे.

पंतप्रधान मोदी युक्रेनच्या दौऱ्यावर गेले तेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा संदेश घेऊन ते राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्याकडे पोहोचले असावेत, असे वृत्त होते. परंतु दोन्ही देशांच्या निवेदनात याचा कोणताही उल्लेख किंवा संकेत देण्यात आलेला नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, युक्रेन युद्धासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून पुढाकार घेतला जात आहे.