ZP Urdu School: शिक्षणाच्या व्यवसायीकरणामुळे दर्जावर परिणाम- डॉ कमर सुरुर
ZP Urdu School: अहमदनगर (प्रतिनिधी) : शिक्षण हे आजच्या युगात माहिती घेऊन जीवनमान उंचविणे किंवा समाजसुधारासाठी शिक्षणाचा वापर करणेसाठी राहिलेले नसून ते नोकरी/उदरनिर्वाहाचे साधन झाले असल्यामुळे त्याचे व्यवसायीकरण झाले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावरही परिणाम झाला असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ कमर सुरुर यांनी केले.
मखदुम सोसायटी, मराठा सेवा संघ व रहमत सुलतान फौंडेशनच्यावतीने जिल्हा परिषद शाळा फकीरवाडा मधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ कमर सुरुर, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान,गाता रहे मेरा दिल ग्रुप च्या अॅड गुलशन धाराणी, साहिल धाराणी,मुख्याध्यापक अंजुम शेख, दिलशाद शेख आदि. उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ कमर सुरुर म्हणाल्या की, इतर बाबीप्रमाणे शिक्षणाचेही हळूहळू खासगीकरण होत आहे. खासगी संस्थेवाले मोठमोठ्या रकमा घेऊन शाळेत प्रवेश देतात. शाळेच्या शिक्षणावरच अवलंबून न राहता पालक मुलांना शिकवण्या लावतात. त्यामुळे खासगी शिकवण्याचे जाळेही मोठ्या प्रमाणात पसरले आहे. यासर्व बाबी खर्चिक आहे. मध्यमवर्गीयांना न पडवडणार्या आहेत,
त्यामुळे शासकीय शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याकारणाने त्या विद्यार्थ्यांचे लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रीत असतात व हे विद्यार्थी जीवनात संघर्ष करुनच यशस्वी झालेले असतात. म्हणून समाजात काम करणार्या संस्थांनी फक्त शालेय मदत ना करता या विद्यार्थ्यांसाठी इतर शैक्षणिक कार्यक्रमही आयोजित करण्यातची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसचांलन सैय्यद फरीदा यांनी केले, प्रास्तविक आबीद दुलेखान यांनी केले तर आभार सुमैय्या पठान यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.