अहमदनगर डिस्ट्रीक्ट फर्टिलायझर्स सीडस अँण्ड पेस्टीसाईड डिलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी छबुराव हराळ
नगर :- अहमदनगर डिस्ट्रीक्ट फर्टिलायझर्स सीडस अँण्ड पेस्टीसाईड डिलर्स असोसिएशची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीची नगर शहरातील नक्षत्र लॉन येथे पार पडली जिल्हा असोसिएशनचे २५०० सभासद असुन असोसिएशन जिल्हयातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे अडचणी सोडवण्याचे काम करते संघटनेच्या सन २०२४ ते २०२९ या पाच वर्षासाठी छबुराव हराळ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या सुरवातीला थोर नेते, महात्मे व संस्थेशी निगडीत अशा दिवगंत विभूतींना श्रध्दांजली अर्पण करुन सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली.
अध्यक्षपदी निवड झालेले छबुराव हराळ हे सन २००० ते २००५ अहमदनगर जिल्हा खते, बियाणे, किटकनाशके या संघटनेचे ५ वर्ष उपाध्यक्ष होते, तसेच गुंडेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे ते विदयमान चेअरमन आहेत, नगर शहरामध्ये पृथ्वी अॅग्रो सर्व्हिसेस या नावाने त्यांनी १९९० साली कृषी व्यवसाया मध्ये पाऊल ठेवले व आज ते नावारुपाला आणले आहे, कृषी व्यवसायाच्या माध्यमातुन ते गेल्या अनेक वर्षा पासुन शेतक-यांना कृषी विषयक योग्य सल्ला व मार्गदर्शन देण्याचे काम करीत आहेत. या निवडी बददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हराळ यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबददल अ.नगर जिल्हा संघटनेचे मा. अध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक सर्वश्री सजंयजी बोरा, विवेकजी कासार, सुनिल मुनोत, रावसाहेब कांगुणे, आबासाहेब भोकरे, रमेश खिलारी, मनोज गुगळे, संतोष तक्ते, विक्रम गदादे, ज्ञानेश्वर शिंदे, संग्राम पवार, दिलीप रोकडे, प्रविण सावंत, सागर कवडे, पवन गांधी, उदय शिंदे, चंद्रकांत उंडे, अमित कासार, सुनिल नवले, सुनिल ढवळे, राहुल निचित, अरविंद बावके, राहुल उंडे यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यकाळास शुभेच्छा दिल्या.
सभेकरीता जिल्हयातील सचिन वरखडे, योगेश सोनवणे, सागर कदम, धनंजय जोशी, विजय गांधी, दिलीप कोकणे, सचिन वने, रविंद्र गुंजाळ, बच्चूशेठ गांधी, बाबासाहेब भोसले, सुधीर परंडवाल, शरद पवार, उपमन्यु शिंदे, व जिल्हयातील सभासद मोठ्या संख्येने हजर होते.