महावितरणचे शनिवारी शटडाऊन नगर शहर पाणी पुरवठा विस्कळीत
महावितरण कडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात येणार असल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे सकाळी ११ ते साय ५ यावेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहित देण्यात आली आहे
त्यामुळे शनिवार ७ डिसेंबर २०२४ बोल्हेगाव,नागापूर,सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड,लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर,मुकुंदनगर, तसेच सारस नगर,बुरूडगाव रोड,केडगाव,नगर कल्याण रोड परिसर या भागात सकाळी ११ नंतर पाणी पुरवठा होणार नाही या भागास रविवारी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे
रविवारी ८ डिसेंबर २०२४ रोजी पाणी वितरण असलेले झेंडीगेट,मंगलगेट,रामचंद्र खुंट,जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,दाळ मंडई,कालू बागवान गल्ली,धरती चौक,बंगाल चौकी,माळीवाडा,कोठी या भागात व गुलमोहर रोड,प्रोफेसर कॉलनी,सिव्हिल हडको,प्रेमदान हडको,टीव्ही सेंटर,हडको,स्टेशन रोड,आगरकर मळा,विनायकनगर या भागात रविवार ऐवजी सोमवारी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे
सोमवारी ९ डिसेंबर २०२४ रोजी पाणी पुरवठा होणारे भाग लालटाकी,सिद्धार्थ नगर,तोफखाना,दिल्लीगेट, नालेगाव,चितळे रोड,आनंदी बाजार,कापड बाजार,खिस्त गल्ली, पंचपीर चावडी,जुनी मनपा कार्यालय,बालिकाश्रम या भागात मंगळवारी १० डिसेंबर २०२४ ला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे