मित्रांच्या चेष्टा मष्किरीचे वादात रूपांतर ; मुकुंदनगरला तरुणाचा खून

मित्रांच्या चेष्टा मस्करीचे वादात रूपांतर ; मुकुंदनगरला तरुणाचा खून 

मित्रांच्या चेष्टा मष्किरीचे वादात रूपांतर ; मुकुंदनगरला तरुणाचा खून




नगर – चार मित्र एकमेकांची  मेडिकलच्या दुकानात चेष्टा-मस्करी करत होते आणि त्यातील दोघांमध्ये यातच वाद सुरू झाले आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दुसऱ्या दोघा मित्रांनी सोडविण्याचे प्रयत्नही  केले असल्याचे यावेळी सीसीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसते परंतु एकाने कात्री हातात घेत सपासप वार केले आणि दुसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. 


दुकानातीलच कात्री घेवून युवकाच्या पाेटावर वार केले. त्यात गंभीर जखमी हाेवून त्याचा मृत्यू झाल्याची घटना मुकुंदनगर मध्ये घडली आहे. जीशान खान (वय 18) असे मयत युवकाचे नाव आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समाेर आले आहे.



या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, मुकुंदनगर परिसरात दर्गादायरा राेडवर बडी मरियम मशीद जवळ असलेल्या जिलानी मेडिकाेज या दुकानात 4 मित्र शुक्रवारी (दि.29) रात्री उभे हाेते, त्यांच्यात बराच वेळ चेष्टा-मस्करी सुरु हाेती. 


सर्वजण हसत खिदळत असताना अचानक शमशाेद्दीन निजामाेद्दीन खान या युवकाने मेडिकलच्या काैंटरवर असलेली कात्री उचलून जीशान खान याच्या अंगावर धावून गेला व त्याच्या पाेटावर कात्रीने वार केले. या वेळी दाेघांमध्ये चांगलीच झटापट झाली. 



मेडिकलमध्ये उपस्थित असलेल्या इतर दाेघा युवकांनी त्यांचे भांडण साेडवले. त्यावेळी जीशान याच्या पाेटातून रक्त येवू लागल्याने त्याला काहींनी तात्काळ उपचारासाठी नगर मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 



 मयताच्या नातेवाईकांनी तसेच इतर नागरिकांनी रुग्णालयाबाहेर माेठी गर्दी केली हाेती. घटनेची माहिती समजताच अप्पर पाेलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे पाेलिस उपअधीक्षक अमाेल भारती, भिंगार कॅम्पचे स.पाे.नि. जगदीश मुलगीर यांच्यासह पाेलिसांच्या पथकाने घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट दिली. 



दरम्यान मेडिकल मधील चेष्टा मस्करी व नंतर झालेल्या हल्ल्याची घटना तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सदर फुटेज पाेलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखाेर शमशाेद्दीन निजामाेद्दीन खान हा पसार झालेला असून पाेलिसांची पथके त्याच्या मागावर रवाना झाली आहेत.


 शनिवारी (दि.30) दुपारी उशिरापर्यंत भिंगार कॅम्प पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.