श्री याज्ञवल्क्य नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत

 श्री याज्ञवल्क्य नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत

श्री याज्ञवल्क्य नागरी सहकारी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत

अहमदनगर (प्रतिनिधी) |

 श्री याज्ञवल्क्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अहमदनगर या पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. सभेचे सूत्रसंचालन आनंदस्वामी अशोक मुळे यांनी केले.

        सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन नरेंद्र सच्चिदानंद कुलकर्णी हे होते. सभे पूर्वी संचालक, सभासद हितचिंतक, तसेच ज्ञात अज्ञात विभूतींना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच देशामध्ये महिला आणि डॉक्टर यांच्यावर अत्याचार करून त्यांचा छळ करून त्यांची हत्या करण्यात आली. या लाजिरवाण्या गोष्टीचा निषेध व्यक्त करुन या अत्याचारात ज्यांची प्राणज्योत मालवली त्यांना भावूक अंतःकरणाने श्रद्धांजली वाहण्यात आली. 

        संस्थेच्या वार्षिक सर्व साधारण सभेच्या नोटीस चे वाचन व्यवस्थापिका स्मिता पोहेकर यांनी केले. त्या विषय पत्रिकेनुसार सर्व विषय सभेत एकमताने मंजूर झाले. संस्थेचे चेअरमन नरेंद्र सच्चिदानंद कुलकर्णी व व्हा. चेअरमन सुधीर नारायण मुळे यांनी सभासदांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे अगदी समाधानकारक अशी दिली.

        संस्थेचे चेअरमन  नरेंद्र कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या प्रगती बाबत आढावा व्यक्त केला व व्हा. चेअरमन श्री. सुधीर मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या नियोजित योजनांची माहिती दिली. तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक प्रा. मधुसूदन गजानन मुळे यांनी संस्थेच्या स्थापनेचा हेतू आणि त्यांनतर चा इतिहास थोडक्यात कथन करुन सहस्त्राची पतपेढी कोटींची कशी झाली हे कथन केले व संस्थेच्या प्रगती चा आनंद व्यक्त केला. सभासदांच्या वतीने पूर्व संचालक मंडळ आणि विद्यमान संचालक यांच्या कार्याचे कौतुक करून सर्वाना पुढील वर्षासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या व सर्व सभासदांना संस्थेत कामकाजात भाग घ्या असे आवाहन केले.

      तसेच संस्थेचे जेष्ठ सभासद व माजी संचालक व मार्गदर्शक दि.ना. जोशी, अजित रेखी तसेच संस्थेचे लेखापरिक्षक व मार्गदर्शक सी.ए.अजय बी. राजुरकर साहेब, लेखापरिक्षक व व मार्गदर्शक सी.ए. घनश्याम एस. सोलंकी साहेब, यांनी संस्थेला योग्य मार्गदर्शन केले.  राजेंद्र नगरकर, श्रीरंग कुलकर्णी, चंद्रशेखर जोशी,  निळकंठ मुळे, सुभाष दारवेकर, हेमंत मुळे,  अनंत कुलकर्णी, सौ. वैजयंती जोशी, सौ, सुरेखा कमळापूरकर, सौ. अपर्णा कुलकर्णी यांनी सभेत सहभाग घेतला. सभेस सभासदांची चांगली उपस्थिती होती. सभासद श्रीरंग कुलकर्णी यांनी संस्थेचे कर्मचारी प्रामाणिक पणे करत असलेल्या कामकाजाचे कौतुक केले व संचालक मंडळ व सभेस विंनती करून सभेत कर्मचार्याचे सत्कार करण्यास सांगितले. संस्थेची सभा खेळीमेळीच्या वातवरणात पार पडली. संस्थेचे तज संचालक गिरीश मुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.