अहिल्याबाई होळकर स्मारक नाणी हा आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारा – आसिफ खान


अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० रुपये स्मारक चांदीच्या नाण्याचे नगरमध्ये सादरीकरण


नगर : दर्शक । 

अहिल्याबाई होळकर या केवळ एक शासक नव्हत्या, तर त्या न्याय, सेवा आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने काढलेला स्मारक चांदी नाणी हा आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारा आहे. 

अशा उपक्रमांमुळे इतिहासाचे संवर्धन होऊन तरुण पिढीला प्रेरणा मिळते. अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ सदैव अशा ऐतिहासिक उपक्रमांना प्रोत्साहन देत राहील.असे प्रतिपादन अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान यांनी केले.

अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारत सरकारतर्फे तीनशे रुपयांच्या चांदीच्या स्मारक नाणी जारी करण्यात आला आहे. या ऐतिहासिक स्मारक नाण्याचे नगर येथील नामवंत जुन्या नाणे व नोटा संग्राहक सचिन डागा यांनी अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाला भेट देत सादरीकरण केले.

याप्रसंगी अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ,आरिफ सय्यद, राजा भैया, पत्रकार आबीद खान यांच्यासह इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना सचिन डागा म्हणाले की, अहिल्याबाई होळकर यांचे सामाजिक, धार्मिक व प्रशासकीय कार्य आजही प्रेरणादायी असून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी भारत सरकारने काढलेला हा स्मारक नाणी ऐतिहासिक महत्त्वाचा ठरत आहे.अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीमध्ये इतिहासाविषयी जागरूकता निर्माण होईल असे नमूद केले.

Scroll to Top