श्री मार्कंडेय मंदिरात सद्गुरु श्री गजानन महाराज प्रकट दिन कार्यक्रम
नगर : दर्शक ।
सद्गुरु श्री गजानन महाराज प्रकट दिन रविवार दिनांक 08 फेब्रुवारी 2026 रोजी येत असून या दिवशी सालाबाद प्रमाणे श्री. मार्कंडेय मंदिर देवस्थान, गांधी मैदान, अहिल्यानगर येथे श्री सद्गुरु गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे उपाध्यक्ष त्रिलेश येनगंदुल यांनी दिली.
प्रकट दिनी सकाळी श्रींचा अभिषेक व आरती तसेच प्रसाद वाटप , सायंकाळी ५ वाजता श्री अंबिका महिला भजनी मंडळाचा भजनांचा कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता श्री सद्गुरू गजानन महाराजांची महाआरती, व संध्या.७.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
संध्या. ७.३० ते रात्री ९ वाजता भजन संध्या. याप्रमाणे प्रकट दिनाच्या दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, तरी सर्व भक्तांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन श्री सद्गुरूंचे दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
तसेच महाप्रसादासाठी ज्या भक्तांना सीधा स्वरूपात किंवा रोख देणगी द्यावयाची असेल त्यांनी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा 98 90 100 879, किंवा 98 60 34 56 59 या नंबर वर संपर्क करावा, असे देवस्थान कमिटी कडून आवाहन करण्यात येत आहे.
.webp)