ज्ञानेश्वरनगर येथील महिलांचा सार्वजनिक हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
नगर : दर्शक ।
नगर : ज्ञानेश्वरनगर येथील सर्व महिलांनी एकत्र येत परंपरा, आपुलकी आणि सामाजिक एकोपा जपणारा सार्वजनिक हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला. या कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेविका सौ. दीपाली बारसकर, सौ. संध्या पवार, सौ. रुपाली वारे, सौ. पूनम तवले, सौ. रोशनी त्र्यंबके या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व महत्व सौ. सुनीता तागड मॅडम यांनी अत्यंत समर्पक शब्दांत विशद केले. त्यांनी संक्रांती सणामागील सामाजिक संदेश स्पष्ट करताना सांगितले की, तीळ जरी रंगाने पांढरा व साधा असला तरी स्नेह वाढवणारा आहे, तर गूळ पिवळा, गोड व मधुर असतो. या दोघांची सांगड घालून तिळगुळ तयार होतो. त्याचप्रमाणे समाजातील वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांनी परस्परांशी प्रेम, सौजन्य व आपुलकीने वागले पाहिजे.
संक्रांतीच्या निमित्ताने समाजाशी एकरूप होण्याचा संकल्प करून चांगल्या चाली-रीती अंगीकाराव्यात व वाईट प्रवृत्ती दूर केल्यास या सणामागील खरा उद्देश साध्य होईल, असे त्या म्हणाल्या. ‘मी प्रत्येकाशी गोड बोलेन’ असा संकल्प जर सर्वांनी केला, तर संक्रांत हा सण केवळ तिळगुळ घ्या, गोड बोला एवढ्यापुरता न राहता तो आपल्या विचारांत व कृतीतून दिसून येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी चंदूकाका सराफ यांनी विविध स्पर्धांचे आयोजन करून महिलांना संक्रांतीचे वाण दिले. त्यामुळे कार्यक्रमात अधिक रंगत व उत्साह निर्माण झाला.
कार्यक्रमास ज्ञानेश्वरनगर परिसरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. सौ. सुनीता तागड, सौ. जगदाळे मॅडम, सौ. नंदा घुले, सौ. अंजली डांगे, सौ. रोहिणी शेळके, सौ. शिला देशमुख, सौ. वनिता गाडे, सौ. रंजना खिलारी, सौ. सुवर्णा घुगरकर, सौ. भाग्यश्री चव्हाण आदी महिलांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. सामाजिक सलोखा, परंपरेचे जतन आणि महिलांचा सहभाग यांचा सुंदर संगम या सार्वजनिक हळदी-कुंकू कार्यक्रमातून पाहायला मिळाला.
.webp)