Ahmednagar College | अहमदनगर कॉलेजमध्ये महिला दिनानिमित्त ‘वूमन सेल’ आयोजित विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
Ahmednagar College | नगर : दर्शक । आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अहमदनगर कॉलेजमध्ये ‘वूमन सेल ‘तर्फे दोन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थीनी व सर्व महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
६ मार्च रोजी *“Self Care is Not Selfish”* या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ‘प्रियंका पाटील ‘यांना आमंत्रित करण्यात आले त्यांचा सत्कार रजिस्ट्रार कल्पलता भिंगारदिवे यांनी केला ,डॉ प्रियंका पाटील यांनी महिला कर्मचारी व विद्यार्थीनींना दैनंदिन जीवनातील त्वचा संरक्षणाच्या सवयी तसेच निरोगी आणि आरोग्यदायी त्वचेसाठी आवश्यक उपाययोजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
७ मार्च रोजी *Miss ACA* स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी विविध संस्कृतींतील पोशाख परिधान करून गाण्याच्या तालावर रॅम्प वॉक सादर केला. विविध पारंपरिक वेशभूषा आणि दागिने परिधान करून विद्यार्थिनींनी प्रभावी सादरीकरण केले.
या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी श्रुती मानवेलीकर (सुरभी ब्युटी अकॅडमी ओनर), अॅड. रचना काकडे (फॅशन डिझायनर) आणि करिष्मा कोठारी (भरतनाट्यम नृत्य प्रशिक्षक) यांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा सत्कार ‘ वूमन सेल’ कॉर्डिनेटर प्रा.रुपाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच वेळी उपस्थित आदरणीय प्राचार्य डॉ अभिजीत कुलकर्णी सर यांचादेखील सत्कार रजिस्टर कल्पलता भिंगारदिवे यांच्या हस्ते करण्यात आला.
परीक्षकांच्या निर्णयानुसार *Miss ACA* होण्याचा मान भूमिका बरुआ हिने पटकावला. (द्वितीय क्रमांक) साक्षी झवरे हिने, तर (तृतीय क्रमांक) अंशु उपाध्याय हिने मिळवला. आसाम संस्कृतीतील वेशभूषा परिधान करून सहभागी झालेली भूमिका बरुआ(Miss ACA) ही कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली. स्पर्धकांना उपस्थित परीक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने व मोठया जल्लोषाने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा .प्राची वाळुंजकर ,प्रा.आयेशा सय्यद प्रा. फरीन खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच भा. पा. हिवाळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर .जे बार्नबस, सचिव श्री. विशाल बार्नबस, प्राचार्य डॉ. अभिजीत कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. प्रीतमकुमार बेदरकर, उपप्राचार्य डॉ. दिलीपकुमार भालसिंग, विभागप्रमुख डॉ. सय्यद रजाक सर तसेच रजिस्टर कल्पलता भिंगारदिवे,वूमन सेल कॉर्डिनेटर प्रा .रुपाली कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निवेदिता मॅडम आणि प्रा. निशा मॅडम यांनी केले. सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला.
.webp)
.webp)