Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयाच्या NSS विशेष हिवाळी शिबिराचा ससेवाडीत उत्साहात समारोप
Ahmednagar College | नगर : दर्शक ।
भा. पां. हिवाळे शिक्षण संस्थेचे, अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने मौजे ससेवाडी, ता. नगर येथे दि. १६ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित विशेष हिवाळी निवासी शिबिराचा समारोप संस्थेचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या प्रेरणेने आणि प्रभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे याच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या सात दिवसांच्या शिबिरादरम्यान स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान, श्रमदान, सीना नदी उगम परिसर स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण जनजागृती, व्यसनमुक्ती तसेच सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविले.
समारोप कार्यक्रमास ससेवाडी गावच्या सरपंच सौ. रोहिणीताई आठरे, उपसरपंच सौ. अश्विनीताई बळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयातील विनाअनुदानीत विभाग समन्वयक डॉ. सय्यद रझाक, उपप्राचार्य प्रा. दिलीपकुमार भालसिंग, डॉ. प्रितमकुमार बेदरकर आणि प्रबंधक श्रीमती. कल्पलता भिंगारदिवे, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष समन्वयक डॉ. प्रसाद लामरूड, रासेयो इ टी आय समन्वयक डॉ. गोकुळ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ डॉ. वसंतराव आठरे, श्री. शंकरराव बळे, श्री. विष्णू जरे, सौ. अर्चना ससे, श्री. संकेत जरे, श्रीम. भाग्यश्री ससे, श्री. विजय जरे, श्री. अशोक काळे आणि इतर ग्रामस्थ यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
हे शिबिर कार्यक्रम अधिकारी डॉ. रविकिरण लाटे, प्रा. सय्यद झरीना यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले. मान्यवरांनी स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, शिस्त व राष्ट्रसेवेची भावना निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ससेवाडी ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच सर्व सहकार्य करणाऱ्या घटकांप्रती राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. “मी नव्हे, समाजासाठी” या ब्रीदवाक्याची प्रचीती देणारे हे शिबिर स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत समारोपप्रसंगी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे समालोचन प्रा. अभिषेक सांगळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. सीमा तिकोने यांनी केले.
.webp)