Ahmednagar College | अहमदनगर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा

Ahmednagar College |  अहमदनगर कॉलेजमध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा

 

 

Ahmednagar College | नगर : दर्शक । बी.पी.एच.ई. संस्थेचे अहमदनगर कॉलेज, नगर येथील वाणिज्य विभाग व संशोधन केंद्रा तर्फे आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिवस मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिनाच्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नोएल पारगे सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात सूत्रसंचालिका कु. सुहाना पठाण यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. परेश बोरा यांनी वाणिज्य दिनाच्या दिवशी कार्यक्रमाची संकल्पना मांडताना असे प्रतिपाळदन केले की, या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये स्वयं-अभिव्यक्ती, नेतृत्वगुण आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होईल. कॉमर्स डे केवळ एक उत्सव न राहता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरेल. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नोएल पारगे सरांचा सन्मान विभागप्रमुखांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

डॉ. शभनम गुरूंग यांनी विद्यार्थ्यांना मागील वर्षी विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी प्रभावी पद्धतीने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. या प्रेझेंटेशनमध्ये गेस्ट लेक्चर्स, उद्योगभेटी, कौशल्यविकास कार्यशाळा, स्टार्टअप मार्गदर्शन सत्रे, आर्थिक साक्षरता अभियान आणि विविध स्पर्धांचे उल्लेख होते. यामुळे नव्या विद्यार्थ्यांना विभागाच्या उपक्रमशीलतेची स्पष्ट कल्पना मिळाली.

 

विविध शैक्षणिक व सांघिक उपक्रमांचे प्रदर्शन

कॉमर्स अ‍ॅक्टिविटी फ्लेक्सचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर नोएल पारगे, वाणिज्य विभाग प्रमुख सीए डॉ. परेश बोरा, वाणिज्य संशोधन केंद्र समन्वयक डॉ. रवींद्र देशमुख , प्रा. आनंद रायकवाड, प्रा. डॉ. शबनम गुरूंग यांच्या हस्ते करण्यात आला. यात वर्षभरातील विविध शैक्षणिक व सांघिक उपक्रमांचे प्रदर्शन करण्यात आले.

 

 

वाणिज्याचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात असलेले महत्त्व आणि आपत्कालीन परिस्थितीत देशाला वाणिज्य मुळे होणार्‍या फायद्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नोएल पारगे सरांनी आपल्या मार्गदर्शनात केले. त्यांनी सांगितले की, वाणिज्य शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक शिस्त, व्यवस्थापन कौशल्य, आणि बाजारातील बदल ओळखण्याची क्षमता विकसित होते, जी त्यांना भविष्यातील संधींचा योग्य उपयोग करण्यास मदत करते.

 

 

आणीबाणीच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याकरिता वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञांची मोठी भूमिका असते. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून दिली व त्यांना आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायिक जगतात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्‍वास निर्माण झाला.

 

महाविद्यालयाच्या रजिस्टार कल्पलता भिंगारदिवे मॅडम त्यांचे सहकार्य या कार्यक्रमासाठी मोलाचे होते.कार्यक्रमाचा समारोप श्री. अभिषेक सांगळे यांच्या आभारप्रदर्शनाने झाला. त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि भविष्यात आणखी उपयुक्त आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारे उपक्रम राबवण्याची घोषणा केली.

 

वाणिज्य दिवसाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून प्रा. मौसमी भंडारी, प्रा. स्वाती कटारिया, प्रा. अंकिता चक्रनारायण, प्रा. सदफ शेख,प्रा. ऐश्‍वर्या गोयल, प्रा. पुष्कर बिबवे प्रा. रामस्वरूप जांगीड, प्रा. अब्दुल्ला खान यात सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग या कार्यक्रमाला लाभला.

Scroll to Top