Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षेत उत्तुंग भरारी

Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील एफ.वाय.बी.सी.ए. विभागातील विद्यार्थ्यांची परीक्षेत उत्तुंग भरारी

 

Ahmednagar College |  अहमदनगर : दर्शक । – अहमदनगर महाविद्यालयाच्या एफ.वाय.बी.सी.ए. विभागातील विद्यार्थ्यांनी अलीकडील परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. अहमदनगर महाविद्यालयात एफ वाय बी सी ए विभागाचे नुकतीच निकाल हाती आला आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तनवी बोरा हिने 96.4 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. मृदुला देशमुख हिने 94.4 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक तर नेवील चक्रनारायण याने 92.7 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.

 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नोएल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सय्यद रज्जाक यांच्यासह प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी प्राचार्य डॉ.पराग पारगे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर हे घवघवीत यश मिळवले आहे. हे आमच्या शिक्षणपद्धतीसाठी आणि संपूर्ण संस्थेसाठी गौरवाचे क्षण आहेत.” विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या नवनवीन शिक्षण पद्धतींचा आढावा घेतला.

 

त्यांनी सांगितले की, “महाविद्यालयात केवळ पाठ्यपुस्तकापुरते शिक्षण न राहता प्रात्यक्षिक शिक्षण, संगणकीय प्रयोगशाळा, प्रोजेक्ट आधारित अध्यापन व वैयक्तिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या प्रत्येक गोष्टीची उपलब्धता महाविद्यालय पुरवते, यामुळेच असे यश शक्य होते.”
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बी. पी. एच. हिवाळे संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. जे. बार्नबस यांनी कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

विभागप्रमुख, शिक्षकवृंद व पालकांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.