Delhi Gate Nagar | महिला उद्योजकता स्टॉलच्या माध्यमातून महिलांसाठी खुले व्यासपीठच-धनश्रीताई विखे पाटील
Delhi Gate Nagar | नगर : दर्शक ।
स्वकुळसाळी हित संवर्धक महिला मंडळाच्या वतीने यशस्विता प्रदर्शनाचे माध्यमातून महिलांना स्टॉल लावण्यासाठी व्यासपीठ खुले केले आहे. महिलांसाठी आयोजित या उपक्रमामुळे व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळत आहे.या स्टॉलला महिलांनी मोठ्या संख्येने भेट देऊन खरेदी करावी.
आपल्या शहरातील महिलांचा व्यवसाय मोठा झाला तर त्या महिलांमूळे आपल्या गावाचे नाव देखील मोठे होईल.व्यवसाय करताना महिला ही महिलांना सोबत घेऊन उद्योजकता व्यवसायात कार्य करीत असते.महिला उद्योजकता स्टॉलच्या माध्यमातून महिलांसाठी खुले व्यासपीठच निर्माण झाले आहे. असे प्रतिपादन रणरागिनी महिला मंडळाचे अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांनी केले आहे.
दिल्लीगेट पटांगण येथे जागतिक महिला दिनानिमित्त स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ संचलित महिला मंडळ आयोजित महिला उद्योजकता व सक्षमीकरणासाठी यशस्विता प्रदर्शन प्रसंगी केले
प्रदर्शनाचे उद्घाटन उद्घाटन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे,महापौर ज्योतीताई गाडे,उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी उद्योजक राजूशेठ भंडारी,नगरसेविका मयुरी जाधव, सुप्रिया जाधव,भाजपचे अध्यक्ष प्रियाताई जानवे,गीता गिल्डा, ज्योती दांडगे,उज्वला भांगे,
अनुजा कांबळे,ऋतुजा धोत्रे, जयश्री सुळ,वनिता मानकर,सौ. स्नेहा पाठक, सौ. शितल सागांवकर, सौ. जया वैद्य., स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख विक्रम पाठक,कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत तरोटे ,खजिनदार गजेंद्र सोनवणे,
सचिन मडके,संस्कृती श्रीनिवास कनोरे शाळेचे चेअरमन जितेंद्र लांडगे,सचिव संजय सागावकर, संजय दळवी, योगेश भागवत,प्रवीण झिंजे,अभिजीत अष्टेकर, कृष्णा बागडे,योगेश पांढरपोटे, उमेश कोदे ,प्रदीप दळवी, किशोर विंचुरकर आदी उपस्थित होते.
महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या,या प्रदर्शनामध्ये महिलांनी हस्तकला,पापड, मसाले,लोणचे आदींसह कपडे खाद्यपदार्थांचे उत्तम स्टॉल कलाकुसरीने लावण्यात आले आहे.यामुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. महिलांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.सकुळसाळी हितसंवर्धक महिला मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे.सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा.
उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले,महिला सबलीकरणासाठी शासनाच्या वतीने वेगवेगळे पाऊल उचलले जात आहे.नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांनी नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे.महिला उद्योजकांना महापालिकेच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य केले जाईल.
गेल्या पंचवीस वर्षापासून स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम समाजासाठी राबविले जातात. स्टॉलच्या माध्यमातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळत आहे.यापुढील काळातही महिलांसाठी समाजाने असे उपक्रम राबवावेत.
.webp)