Dr Vikhe Patil College: डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी हे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट कॉलेज- आलोक जैन

डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी हे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट कॉलेज-  आलोक जैन      

Dr Vikhe Patil College: डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी हे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट कॉलेज-  आलोक जैन



 अहमदनगर (प्रतिनिधी)   – विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला  ब्रिगेडियर अलोक जैन व इंजिनीअर भारत ओस्तवाल यांनी भेट दिली. या प्रसंगी डॉ. विठ्ठलराव विखे पा. फौंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर टेक्निकल प्रा. सुनिल कल्हापुरे व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय नाईक विभागप्रमुख मेकॅनिकल इंजि. व विभागप्रमुख ई अॅण्ड टी. सी., माजी विद्यार्थी समन्वयक तसेच ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफीसर हे उपस्थित होते. 


या प्रसंगी ब्रिगेडियर अलोक जैन व इंजिनीअर भारत ओस्तवाल यांनी मॅनेजमेंट, प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच या महाविद्यालया मुळेच आम्ही उच्च पदावर काम करत आहोत असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. ज्या कॉलेज मधे घडलो त्या कॉलेजला प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे भाग्य आम्हाला लाभले असे त्यांनी सांगितले.

 

ब्रिगेडियर अलोक जैन यांनी १९९३ मधे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरींग मधून पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी भारतीय सेनेमध्ये विविध पदे भूषविली. त्यापैकी अत्यंत प्रतिष्ठेचे असलेले सेना मेडल हा बहुमान त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते बहाल करण्यात आलेला आहे. हा बहुमान  त्यांनी केलेल्या विशेष पराक्रमा बद्दल बहाल करण्यात आला होता.


महाविद्यालयातील झालेला आधुनिक बदल आणि आत्मसात केलेले आधुनिक तंत्रज्ञान व त्याचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात केलेला वापर पाहून समाधान व्यक्त केले. तसेच आपल्या जीवनात मिळालेल्या यशामध्ये महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे.  त्याची आठवण म्हणून त्यांनी महाविद्यालयास स्मृतिचिन्ह भेट दिले. सध्या ब्रिगेडियर अलोक जैन हे आर्मी हेड क्वार्टर, नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.



इंजिनीअर भारत ओस्तवाल यांनी १९९३ साली मेकॅनिकल इंजिनीअरींग मधून पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी विविध पदांवर काम करुन आज ते पुणे येथील बहुनामांकित कंपनी एल. पी. इस्टेट अॅण्ड डेव्हलपर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनीही महाविद्यालयातील सुविधा आणि झालेल्या बदलांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.या स्वागत समारंभाचे आयोजन डॉ. संदिप उदावंत, समन्वयक, माजी विद्यार्थी यांनी केले.



डॉ. विठ्ठलराव विखे पा. फौंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर टेक्निकल प्रा. सुनिल कल्हापुरे व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमचे कॉलेजचे विद्यार्थी आज उच्च पदावर काम करीत असल्याचा सर्वांना त्याचा अभिमान वाटतो असे सांगून त्यांचे कौतुक केले. संस्थेचे चेअरमन व महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील, संस्थेचे प्रभारी सेक्रेटरी जनरल डॉ. पी.एम. गायकवाड यांनी शुभेच्छा देत कौतुक केले.