Gangster Aandekar | गँगस्टर बंडु आंदेकर,भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांनी शनिवारी आपला उमेदवारी अर्ज भरला

Gangster Aandekar | पुणे : आयुष कोमकर खुन प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला गँगस्टर बंडु आंदेकर तसेच त्यांची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांनी शनिवारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयने सशर्त परवागनी दिली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणुक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी करु नये, असे आदेश विशेष न्यायालयाचे एस आर साळुंखे यांनी दिले होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार बंडू आंदेकर त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांनी शनिवारी (२७ डिसेंबर) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नाना पेठेतील टोळीयुद्ध, वर्चस्वाच्या वादातून गणेश विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने आयूष कोमकर याचा नाना पेठेत खून केला होता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणाचा सूड उगविण्यासाठी आयुष कोमकर याचा खून करण्यात आला होता.

निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, असे नमूद करुन विशेष न्यायालयाने आरोपींना पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक ठिकाणी भाषण करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


आंदेकर कुटुंबातील उदयकांत आंदेकर आणि वनराज आंदेकर हे नगरसेवक होते. त्यांची पत्नी लक्ष्मी आणि वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली हे निवडणुक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Scroll to Top