Home Minister Nagar | पहिले बक्षीस रु.१२,००० ची पैठणी,सर्व महिलांसाठी खुला

Home Minister Nagar | नगर : दर्शक । येथील स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळ, बागडपट्टी व भगवान जिव्हेश्वर मंदिर, दिल्लीगेट पटांगण यांचे संयुक्त विद्यमाने भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव निम्मित खेळ पैठणीचा-होम मिनिस्टर हा कार्यक्रम रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी,सायंकाळी. ४:३० वाजता भगवान जिव्हेश्वर मंदिर प्रांगण,दिल्लीगेट,अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.१२,०००ची पैठणी,द्वितीय पारितोषिक रु.८,००० ची पैठणी,तृतीय पारितोषिक रु.५,००० ची पैठणी व उत्तेजनार्थ स्पर्धकांना बक्षिसे देण्यात येणार आहे. लोकप्रिय आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते पारितोषिक वितरण स्पर्धा संपल्यावर लगेच होणार आहे . सर्व महिलांसाठी हा कार्यक्रम खुला असून या कार्यक्रमात सहभाग घेऊन व पाहण्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन छाया साळी,शैला मानकर,शुभदा वल्ली,जयश्री कोदे,अनिता सुरेश कांबळे,अनिता शरद कांबळे,वनिता
मानकर, अनिता सवई,कल्याणी पावले,प्रा.अनुराधा मिसाळ,सुरेखा शेकटकर,वनिता पाटेकर,वैशाली आकडे.माधुरी खडामकर,वैशाली
येवलेकर,स्नेहा पाठक,स्वाती बागडे,वैशाली कांबळे,सायली वैद्य,पल्लवी कनोरे,रागिणी ओहोळ,श्वेता झोंड,नेहा कांबळे,आरती ढोरे,अमृता कांबळे
आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे