Meherbaba Nagar | मेहेरबाबाच्या अमरतिथीस प्रारंभ,जय मेहेर जय घोषाने दुमदुमली बाबाची टेकडी 

Meherbaba Nagar | मेहेरबाबाच्या अमरतिथीस प्रारंभ,जय मेहेर च्या जयघोषाने दुमदुमली बाबाची टेकडी 

 

 

Meherbaba Nagar | नगर : दर्शक ।

येथील दौंड रोडवरील मेहराबाद(अरणगाव)मधील मेहेरबाबाच्या टेकडीवरील समाधी स्थळी ५७ वीअमरतिथी(पुण्यतिथी) सोहळा आजपासून प्रारंभ झाला आहे त्या निमीत मोठ्या संख्नेने कालपासून भाविक येण्यास सुरवात झाली असून आज पहाटे पासूनचं समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या आहेत सुमारे ८० हजाराच्या वर  मेहेरप्रेमी भारतातून आले आहेत. दि १ फेब्रुवारी  पर्यंत हा सोहळा होणार आहे.

 

 

दर्शनासाठी टोकन पद्धत वापरली जाते त्यामुळे गडबड,गोंधळ होण्याचा संभव नसतो एका वेळेस पाचशे लोकांना टोकन दिले जाते त्याचा नंबर प्रमाणे दर्शनास सोडले जाते त्याची ही वेळ आधी सांगितली जाते.त्याप्रमाणे भाविक रांगेत उभे राहतात.त्याच्या साठी दर्शन रांग व त्यावरील मंडप ,पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.

 

 

नगर शहरापासून ६ की मी असेलेल्या मेहराबाद येथील टेकडी मेहेरप्रेमी जणांनी फुलून गेली आहे.अवतार मेहेरबाबा कि जय चा जयघोष ते करत आहे.सकाळी ११  वा बाबाच्या प्रतिमेचे पूजन करून विविध भाषेतून आरती प्रार्थना म्हणून अमरतिथीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

 

 

कार्यक्रमासाठी चाळीस हजार भाविक बसतील असा भव्य मंडप आहे. मेहेरप्रेमी भजने,गजल,नृत्ये,कव्वाली,गाणे,नाटिका सादर करतील त्याच बरोबर बाबावरील फिल्म ही दाखवण्यात येतील.संपूर्ण तीन दिवसभर हा कार्यक्रम चालू राहणर आहे.

 

 

एस टी ने येणाऱ्या भाविकांसाठी तीनही बसस्टेशन वरून मेहेराबादला बसेस सोडण्यात येत आहे.पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर  आहे.अग्निशामक दल हि आहे,अनेक उपहारगृहे,प्रसादाची दुकाने,बाबाची फोटो,किचेन आदि विविध वस्तूची दुकाने मोठ्या प्रमाणात आहे. तर हजारो युवक,युवती  स्वयसेवकाचे काम करत आहेत.

 

 

मेहेरबाबांचे असंख्य भक्त जगात  असून असंख्य केंद्रेही आहेत.सर्व जाती धर्मातील लोकांना मानवतेचा व सत्याचा संदेश देत त्यांनी जगभर प्रवास केला जगात मी कोठेही देह सोडला तरी मेहेरावाद येथे बांधलेल्या समाधीत मला समाधीस्त करावे असे त्यांनी सांगून ठेवले होते ३१ जाने १९६९ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले.म्हणून या ठिकाणी अमरतिथी सोहळयासाठी लाखो भाविक येत असतात.

Scroll to Top