Meherbaba Nagar | मेहेरप्रेमी कडून पो नि शनीधर त्र्यंबके यांना कृतज्ञतेचे मानचिन्ह

Meherbaba Nagar | नगर : दर्शक । नगर-सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शनीधर त्र्यंबके यांच्या सलग ३२ वर्षाच्या निष्ठावान सेवेसाठी, तसेच नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील व्हिसा विभागात त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्त करण्यात करण्यासाठी परदेशी व स्थानिक अवतार मेहेरबाबा प्रेमींनी आज त्यांचा सेवानिवृत्ती बद्दल सन्मान करून डॉ मेहेरनाथ कलचुरी यांच्या हस्ते त्यांना मानपत्र दिले
यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत,किशोर पठारे,सोमनाथ वडणे,मेहरनाथ कलचुरी,ऍलन वॅग्नर,क्रेक रूफ, हैदर नेले,जेन्स रेमॅन,शेली रेमेने,फ्लन्ट मॅग्नेट,केसी कुक,राहुल कांबळे,रॉबर्ट स्ट्रीट,केसर स्ट्रीट,युके मोरी,नितीन खाडे,जोअंड टोमकीं,दादर फॅमिली,वैभव जोशी आदींसह परदेशी व स्थानिक मेहेरप्रेमी मोठ्या संख्नेने उपस्थित होते
त्र्यंबके यांनी प्रामाणिकता, परिश्रमशीलता आणि सेवाभाव यांमुळे असंख्य परदेशी मेहेरबाबा प्रेमींना दिलासा व मदत लाभलेली आहे. त्यामुळे मेहेरनाथ कलचुरी,अवतार मेहेरबाबा ट्रस्ट,अहिल्यानगर व सर्व मेहेरबाबा प्रेमी अवतार मेहेरबाबा यांनी त्यांचा सन्माननगर मधील मेहेर सेंटर मध्ये केला व कृतज्ञतेचे मानचिन्ह मनःपूर्वक अर्पण केले
परदेशी नागरिकांना अनंत अडचणींना सामना करावा लागतो,सर्व कागदपत्रे अपडेट ठेऊन ती पोलिसांना दयावे लागते यासाठी पोलिसांचा व्हिसा विभाग सर्व परदेशी नागरिकांना कायम सहकार्य करत आहे एखादे कागद राहिला तरी फोन करून ते मागवून घेत होते व सर्व अडचणी सोडवण्यास मदत गेली अनेक वर्षे सहकार्य करत आहे. येथे गेली ३२ वर्षे असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शनीधर त्र्यंबके यांची मोलाची मदत झाली म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला.अश्या प्रकारचा पोलिसांचा परदेशी नागरीकडून क्वचितच घडत असेल