Nagar Music | महाराष्ट्राची सुप्रसिद्ध युवा पार्श्वगायिका आर्या आंबेकर यांची मराठी व हिंदी गीतांची मैफल

Nagar Music | नगर : दर्शक । पुनीत बालन ग्रुप सादर तालचक्र युवा, पुणे व अनाहत एक कलासृष्टी,अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात सोमवार दि. 25ऑगस्ट 2025 रोजी सायं. 6.30 वाजता नंदनवन लाँन्स, न्यू टिळक रोड येथे सा रे ग म प फेम, महाराष्ट्राची सुप्रसिद्ध युवा पार्श्वगायिका आर्या आंबेकर यांची मराठी व हिंदी गीतांची मैफल सादर होणार आहे.
कितीदा तुला नव्याने आठवावे, फुलवंती, बाई गं कस करमत नाही गं, हृदयात वाजे समथिंग, माझा होशील ना यांसारख्या गाण्यांनी रसिक मनावर आर्या आंबेकर यांनी भुरळ घातली आहे. तरुण पिढीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यँत सर्वांना आपल्या मधुर आवाजाने मोहिनी घालणार्या आर्या आंबेकर यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ठ पार्श्वगायिका पुरस्कार मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्राप्त झाला. सा रे ग म प लिटिल चॅम्प पासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आपण सर्व नगरकर रसिकांनी पाहिला आहेच. आर्या आंबेकर live in Concert पहिल्यांदाच नगर शहरात होत आहे.
तसेच कार्यक्रमाला पद्मश्री पं. विजय घाटे, आमदार संग्रामभैय्या जगताप, मा. जिल्हाधिकारी पंकजजी आशिया, मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेसाहेब, उद्योजक नरेंद्रजी फिरोदिया,श्री. धनेशजी बोगावत, ज्ञानेशजी शिंदे, विलास बडवे, चंद्रकांत पंडित आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास प्रवेशिका शहराच्या विविध भागात उपलब्ध आहेत
देणगी प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण – 1) अरुणोदय औषधालय – भिस्तबाग चौक, पाईपलाईन रोड,सावेडी 2) श्रेया सुवर्णपाठकी – 7972024059- एकविरा चौक, श्रीराम चौक,तपोवन 3) राज ऑप्टिकल्स – प्रोफेसर चौक, सावेडी
4) हॉटेल स्वीट होम – प्रेमदान चौक, सावेडी 5) करंदीकर हॉस्पिटल – सिद्धार्थनगर,लालटाकी,बालीकाश्रम रोड
6) गोपाल चष्मावाला – स्टेट बँकेसमोर समोर, दिल्लीगेट 7) विलास बडवे – 8668785640, 9422084110-अर्बन बँक कॉलनी,आनंदऋषी हॉस्पिटल जवळ, बुरुडगाव रोड, मार्केट यार्ड, सारसनगर 8) ओंकार देऊळगावकर – 9518733946 – भिंगार, दरेवाडी 9) योगेश पंडित – 90288 31327 – केडगाव 10) आनंद कुलकर्णी – 9309718151 – कल्याण रोड 11) सौ. अमृता बेडेकर – 9673558007 – नगर शहर या ठीकाणी संपर्क साधावा.
या कार्यक्रमातून नगरकर श्रोत्यांना एक वेगळी पर्वणी मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त रसिकांनी लवकरात लवकर आपले तिकीट बुक करून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन अनाहत एक कलासृष्टीचे अध्यक्ष श्री.प्रसाद सुवर्णपाठकी व उपाध्यक्ष श्री. अविनाश शिरापुरी यांनी केले आहे.
