Nagar News | शिक्षक दिनानिमित्त कलाशिक्षक बाळकृष्ण पात्रे यांनी जागवल्या आठवणी
Nagar News | नगर : दर्शक ।
5 सप्टेंबर शिक्षक दिन ज्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नावाने साजरा केला जातो ते माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जुन्या आठवणी नगरचे सेवानिवृत्त कलाशिक्षक बाळकृष्ण पात्रे ज्यांचे वय आज 76 आहे त्यांनी सांगितल्या
1964 साली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त 61 वर्षांपूर्वी जेव्हा ९ वी मध्ये शिकत होते तेव्हा त्यांनी त्यांचे चित्र काढून वाढदिवस व दिवाळीच्या शुभेच्छा पत्र पाठवले होते. तेव्हा त्यांना राधाकृष्णन यांचे उत्तर आले होते व स्वतःच्या सहीचा फोटो त्यांनी पाठवला होता. त्यांनी ओरिजनल फोटोवर सही करून तो पाठवला होता.आजही ते पत्र व ते फोटो त्यांनी आपल्या संग्रही जपून ठेवला आहे
त्या काळात सामान्य विद्यार्थी,नागरिकांची दखल ते घ्यायचे व खऱ्या अर्थाने ते शिक्षक होते असे पात्रे सरांनी सांगितले
