Nagar Sports | शालेय स्विमिंग स्पर्धेत श्री साई स्कूलचा आदित्य जावळे प्रथम 

Nagar Sports | शालेय स्विमिंग स्पर्धेत श्री साई स्कूलचा आदित्य जावळे प्रथम 

 

Nagar Sports | नगर : दर्शक ।

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर मनपा व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क याठिकाणी अनेक विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शालेय स्विमिंग स्पर्धा ही कराळे क्लब हाऊस या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती .

 

सतरा वर्ष वयोगटामध्ये आठ शाळेच्या खेळांडूनी सक्रिय सहभाग घेतला होता. या शालेय स्विमिंग क्रीडा स्पर्धा स्विमिंग क्रीडा संघटनेचे सचिव रावसाहेब बाबर , मनपा क्रीडाधिकारी विन्सेंट फिलिप्स, व जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आल्या. शालेय स्विमिंग क्रीडा स्पर्धेत श्री साई इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजाचा आदित्य जावळे याला 800 मीटर स्विमिंग फ्री स्टाइल स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच 50 मीटर फ्री स्टाइल स्विमिंग स्पर्धेत देखील त्याला यश मिळाले आहे. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

आता पर्यंत श्री साई इंग्लिश मिडियम स्कूल ला विविध क्रीडा प्रकारात सहा सुवर्णपदक मिळाले आहे.

या विजयी खेळाडूचे संस्थेचे अध्यक्ष अशोक कानडे उपाध्यक्ष नंदकिशोर भावसार प्राचार्या तनुजा लोंढे व सर्व शिक्षक वृदांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे. या विजयी खेळाडूला क्रीडा शिक्षक प्रसाद पाटोळे संजय गायकवाड व क्रीडा शिक्षिका मंदा तायडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे

Scroll to Top