Nagar Sports | महाराष्ट्र राज्य कुराश स्पर्धेत नगर संघास उपविजेतेपद

Nagar Sports | महाराष्ट्र राज्य कुराश स्पर्धेत नगर संघास उपविजेतेपद

 

Nagar Sports | नगर : दर्शक । नुकत्याच कोल्हापूर येथे चालुक्य स्पोर्ट्स अकॅडमी न्यू पॅलेस येथे झालेल्या सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य कुराश स्पर्धेत नगर संघाने आठ सुवर्ण, चार रौप्य, पाच कास्य पदक अशी भरघोस कामगिरी करत सतरा पदके जिंकत उपविजेतेपद पटकावले. तीन विविध वयोगटात सदर स्पर्धा संपन्न झाली.

सुवर्णपदक विजेते खेळाडू खालील प्रमाणे –

24 किलो खालील वजनगट मुली 10 ते 11 वयोगट स्वरा डहाळे – सुवर्णपदक, 30 किलो खालील मुले पार्थ दातरंगे – सुवर्णपदक, 35 किलो खाली अनुज बोगा – सुवर्णपदक, 45 किलो खाली विराट करंजुले – सुवर्णपदक, 50 किलो खाली सम्राट करंजुले – सुवर्णपदक, 12 ते 14 वयोगट 44 किलो खालील गट ऋचा बोगा – सुवर्णपदक, 52 किलो खालील गट सिद्धी दातरंगे – सुवर्णपदक, 45 किलो खालील वजन गट मुले युवराज आव्हाड – सुवर्णपदक.

8 व 9 वर्ष वयोगट 24 किलो खालील वजन गट मुली

आर्या शिंदे – रौप्यपदक, 25 किलो खालील वजन गट यशराज गोंधळे – रौप्यपदक, 30 किलो वरील वजन गट वंश बोरा – रौप्यपदक, 10 ते 11 वयोगट 36 किलो खालील मुली खनिका गुप्ता – रौप्यपदक, 10 ते 11 वयोगट 25 किलो खालील गट मुले श्लोक सब्बन – कास्यपदक, 40 किलो खालील वजन गट मल्हार सुरसे – कास्यपदक, 50 किलो वरील वजनगट ओम पोकळे – कास्यपदक, 12 ते 14 वयोगट 40 किलो खालील मुली अनन्या लखापती – कास्यपदक, अमृता झिंजे – कास्यपदक.
वरील सर्व खेळाडू यंग मेन्स ज्यूदो असोसिएशनच्या सिद्धिबाग ज्यूदो कुराश हॉलमध्ये सराव करतात. त्यांना राष्ट्रीय कीर्तीचे ज्यूदो-कुराश मार्गदर्शक प्रा. संजय धोपावकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य धोपावकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर सिद्धिबाग ज्यूदो हॉलचे प्रशिक्षक पै. शुभम दातरंगे, अथर्व नरसाळे यांचे मार्गदर्शन लाभले. ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष मा. नगरसेवक श्री. धनंजय जाधव व कुराश संघटनेचे अध्यक्ष मा. नगरसेवक सचिन जाधव यांचे विशेष प्रोत्साहन लाभले.
   सर्व विजेत्या खेळाडूंचे यशस्वी कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
Scroll to Top