Satkar | मुलींचे करियर घडविण्यात पालकांचे प्रोत्साहन व सासरचे पाठबळ महत्वाचे – शिरीन शेख
Satkar | नगर : दर्शक । मुलींना करियर करण्यात पालक , सासर यांची भूमिका महत्त्वाची असून याच दोन्ही शक्तींच्या बळावर मुली करियर मध्ये मोठी भरारी घेऊ शकतात असे प्रतिपादन जे एम एफ सी पदी नुकतीच निवड झालेल्या शेख शिरीन लालासहब यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी केले.
राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत कनिष्ठ वर्ग न्यायमूर्ती पदासाठी घेतलेल्या जे एम एफ सी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. त्यात नगरच्या शिरीन हिची निवड झाली आहे. शहरातील समाज बांधवाकडून तिचा सत्कार करण्यात आला व भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आले.
या प्रसंगी शहरातील नामांकित वकील एड फारूक बिलाल, एड हाफिज जहागीरदार, एड जावेद शेख, एड नुमेर शेख, एड उमेर शेख, एड नय्यरा शेख , पत्रकार आबीद खान ,उबेद शेख व मोईन शेख, लालाभाई शेख, सी ए हारुण शेख, सी ए, असलम शेख, सी ए ज़ावेद इनामदार, राजुभाई इनामदार, ससुर राजुभाई इनामदार, निसार इनामदार, इंजि. यूनुस शेख, हामिदभाई शेख उपस्थित होते. प्रास्ताविक उबेद शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन एड जबिन शेख यांनी केले.तर आभार अतीक शेख यांनी मानले.