Shikshak Bharti | ३ टक्के महागाई भत्ता तात्काळ द्या – सुनील गाडगे


 Shikshak Bharti |  ३ टक्के महागाई भत्ता तात्काळ द्या – सुनील गाडगे

Shikshak Bharti | ३ टक्के महागाई भत्ता तात्काळ द्या – सुनील गाडगे


Shikshak Bharti | नगर : दर्शक । – केंद्र सरकारने वाढत्या महागाईचा विचार करून दि. १ जुलै २०२५ पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना ३ टक्के वाढीव महागाई भत्ता मंजूर केला आहे. मात्र राज्यातील सरकारी कर्मचारी व शिक्षकांना अद्याप ५५ टक्केच महागाई भत्ता मिळत असून, केंद्र कर्मचाऱ्यांना सध्या ५८ टक्के महागाई भत्ता अनुज्ञेय आहे. ही तफावत अन्यायकारक असून राज्य सरकारने केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता वाढ मंजूर करावी, अशी मागणी शिक्षक नेते तथा शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी केली आहे.

        यासंदर्भात सुनील गाडगे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांना दि. 10 फेब्रुवारी २०२६ रोजी निवेदन पाठविले आहे. बाजारातील महागाई सातत्याने वाढत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे कर्मचारी व शिक्षकांवर मोठा आर्थिक ताण पडत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने दिलेल्या दिलाशाच्या धर्तीवर राज्य सरकारनेही सकारात्मक निर्णय घ्यावा. जानेवारी २०२६ मध्ये महागाई वाढीच्या प्रमाणात पुन्हा महागाई भत्त्याची वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणे दि. १ जुलै २०२५ पासून देय असलेली ३ टक्के महागाई भत्ता वाढ राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांना थकीत फरकाच्या रकमेसह तात्काळ मंजूर करावी. यामुळे राज्यातील कर्मचारी-शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

       या मागणीस शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब जगताप, पुणे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर.जिल्हा सचिव विजय कराळे, विजय लंके, आनंद झरेकर, संजय पवार, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, कार्यवाह संजय भुसारी, कैलास जाधव, नवनाथ घोरपडे, रामराव काळे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सिकंदर शेख, संतोष देशमुख, किसन सोनवने, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, विभावरी रोकडे, मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे, सोनाली अकोलकर तसेच विनाअनुदानित शाळांचे राज्याध्यक्षा रूपाली कुरूमकर आदी पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

Scroll to Top