Urdu Sahitya | डॉ.कमर सुरुर आंतरराष्ट्रीय उर्दू परिषदेसाठी दिल्ली येथे निमंत्रित


Urdu Sahitya | डॉ.कमर सुरुर आंतरराष्ट्रीय उर्दू परिषदेसाठी दिल्ली येथे निमंत्रित

Urdu Sahitya | डॉ.कमर सुरुर आंतरराष्ट्रीय उर्दू परिषदेसाठी दिल्ली येथे निमंत्रित


Urdu Sahitya |  नगर : दर्शक । 

उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय परिषद, नवी दिल्ली ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. ज्याचे उद्दिष्ट उर्दू भाषा आणि साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणे आहे. 


परिषदेच्या व्यावहारिक उपक्रमांची व्याप्ती उर्दूच्या संवर्धनासाठी विविध अभ्यासक्रम आयोजित करणे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे आणि परिषदांचे आयोजन करणे आहे. या संदर्भात परिषद ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान दिल्ली येथे “बहुभाषिक भारतातील उर्दू भाषा आणि संस्कृती” या शीर्षकाने तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय उर्दू परिषद आयोजित करत आहे. 



या निमित्ताने ८ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली येथील एम.ए.अन्सारी सभागृहात एक कविता वाचनाचे आयोजन देखील केले जात आहे. ज्यामध्ये डॉ.कमर सुरुर यांना सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. 


डॉ.कमर सुरुर यांनी यापूर्वीही देश व परदेशात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उर्दू परिषदांसाठी सहभागी होऊन नगरचे नाव उंचविले आहे.

Scroll to Top