Womens Day Nagar | हडकोत महिलांसाठी विविध कार्यक्रम संपन्न
Womens Day Nagar | नगर : दर्शक ।
येथील प्रेमदान हडको येथे चला, महिलांच्या सन्मानासाठी आणि समानतेसाठी एकत्र येऊ या. या थीम वर होम मिनीस्टर कार्यक्रम घेण्यात आला त्याचे आयोजन राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष सुनीता वाल्हेकर व सार्वमत महिला ग्रुप,प्रेमदान हाडको,सावेडी यांच्या वतीने करण्यात आले होते
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सोनाबाई शिंदे,मीनाताई चोपडा,रोशनी त्र्यंबके,आशाताई कराळे,गीतांजली काळे व पोर्णिमा गव्हाळे उपस्थित होत्या तसेच राष्ट्रवादी युवा महिला अध्यक्ष अंजली आव्हाड,राष्ट्रवादी नागपूर महिला अध्यक्ष स्मिता भाकरे,सामाजिक कार्यकर्ता अर्चना भंडारी,उषा सुद्रिक,वंदना भोरे,योगिता ढवण,सोनाली भंडारे,एड.विद्या सोनवणे या पाहुणे म्हणून उपस्थित होत्या
यावेळी बोलताना गीतांजली काळे यांनी मंडळाचे व सुनिता वाल्हेकर यांचे कौतुक केले.हडकोमध्ये कोणताही स्वार्थ नसताना कुठे निवडणुकीला उभे राहत नाही तरीही वर्षातून महिलांसाठी ७ ते ८ कार्यक्रम घेतात व त्यासाठी स्वतः वेळ व आर्थिक खर्च करतात याबद्दल त्यांचे कौतुक केले.प्रत्येक प्रभागात जर असे कार्यक्रम झाले तर महिलांचं एकत्रीकरण होण्यास वेळ लागणार नाही
सुनिता वाल्हेकर म्हणाल्या आम्ही जागतिक महिला दिन एकच दिवस साजरा करत नाही तर वर्षभर साजरा करतो वर्षभरात छोटी मोठी अनेक कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करतो.तसेच खेळ पैठणीचा या कार्यक्रमात तोच खेळ रिपीट न करता दरवर्षी आम्ही नवीन नवीन खेळ घेत असतो.त्यामुळे आमच्या इथे सहभागी होणाऱ्या महिलांना खूप सारा आनंद मिळतो व येथे त्यांना नवीन मैत्रिणी मिळतात.त्यामुळे आमच्या कार्यक्रमाची महिलावर्ग वाट पाहत असतो
या स्पर्धेसाठी लकी ड्रॉ साठी कुबेर मार्केटने बक्षीस दिले होते, तर होम मिनिस्टर साठी चिंतामणी ज्वेलर्सनी नथ, बाफना साडी ने पैठणी, हॉटेल जय आनंदने नऊवारी साडी दिली.तर चंदूकाका सराफ तर्फे विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली वाघमारे यांनी केले.तर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम राजेंद्र टाक यांनी सूत्रसंचालन केले
कार्यक्रमाचे शेवटी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली
